नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , लोकशाहीर आण्णाभाऊ साठेंच्या कादंबऱ्यांचे दोनशेहून अधिक खंड जिल्ह्यातील शालेय ग्रंथालयांना भेट देवून साहित्यिक, प्राचार्य जीवन साळोखे यांचेकडून आण्णाभाऊंना अनोखी आदरांजली – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

लोकशाहीर आण्णाभाऊ साठेंच्या कादंबऱ्यांचे दोनशेहून अधिक खंड जिल्ह्यातील शालेय ग्रंथालयांना भेट देवून साहित्यिक, प्राचार्य जीवन साळोखे यांचेकडून आण्णाभाऊंना अनोखी आदरांजली

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

लोकशाहीर आण्णाभाऊ साठेंच्या कादंबऱ्यांचे दोनशेहून अधिक खंड जिल्ह्यातील शालेय ग्रंथालयांना भेट देवून साहित्यिक, प्राचार्य जीवन साळोखे यांचेकडून आण्णाभाऊंना अनोखी आदरांजली

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, मुरगूड
गेली दोन दशके वाचन प्रोत्साहन आणि शालेय ग्रंथालय समृद्ध होण्यासाठी ग्रंथदान उपक्रमांतर्गत अनेक प्रयोग करणारे साहित्यिक, प्राचार्य जीवन साळोखे हे या शैक्षणिक वर्षांत, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या कादंबऱ्यांचे दोनशेहून अधिक खंड जिल्ह्यातील विविध शालेय ग्रंथालयांना आणि वाचनालयांना आपल्या ‘एकहाती’ ग्रंथदान उपक्रमांतर्गत भेट देणार आहेत. विद्यार्थ्यांसह शिक्षक व पालक या सर्व घटकांना अवांतर वाचनास प्रोत्साहन देणाऱ्या, या प्रेरणादायक उपक्रमांतर्गत, त्यांनी आजपर्यंत पंधरा हजार पुस्तके ‘एकहाती’ शालेय ग्रंथालय आणि सार्वजनिक वाचनालयांना भेट म्हणून दिलेली आहेत.
वाचन चळवळ समृद्ध होऊन विद्यार्थी दशेपासूनच योग्य वाचन संस्कार होण्यासाठी, गेली दोन दशके जिल्ह्यातील शाळाशाळांतून वाचन प्रोत्साहनाचा जागर करणारे जीवन साळोखे हे, या शैक्षणिक वर्षांत थोर साहित्यिक, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या गाजलेल्या कादंबऱ्यांचे खंड शालेय ग्रंथालयांना, टप्प्याटप्प्याने “ग्रंथभेट ” म्हणून देणार आहेत. आण्णाभाऊ साठे यांच्या या प्रत्येक खंडांमध्ये, त्यांच्या अत्यंत गाजलेल्या पाच – पाच कादंबर्‍या समाविष्ट असून, प्रत्येक खंड पाचशेहून अधिक पानांचा आहे. नुकत्याच झालेल्या आण्णाभाऊंच्या एकशे चोवीसाव्या जयंतीच्या (१ ऑगस्ट) पार्श्वभूमीवर त्यांना ही ग्रंथभेट म्हणजे एक अनोखी, कृतीशील आदरांजली ठरणार आहे.
दरम्यान, २०२४ या वर्षात जिल्ह्यातील शंभर शालेय ग्रंथालय व सार्वजनिक वाचनालयांना दोन हजार पुस्तके, ग्रंथभेट म्हणून देण्याचे कार्य आपल्या ग्रंथदान उपक्रमांतर्गत जीवन साळोखे यांनी सुरूच ठेवलेले आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031