नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , पेन्शन क्रांती महामोर्चात खाजगी शाळांतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उपस्थित रहावे : राज्याध्यक्ष भरत रसाळे यांचे आवाहन – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

पेन्शन क्रांती महामोर्चात खाजगी शाळांतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उपस्थित रहावे : राज्याध्यक्ष भरत रसाळे यांचे आवाहन

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

पेन्शन क्रांती महामोर्चात खाजगी शाळांतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उपस्थित रहावे : राज्याध्यक्ष भरत रसाळे यांचे आवाहन

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कोल्हापूर
राज्य सरकारी निमसरकारी कर्मचारी आणि शिक्षक यांना जुनी पेन्शन योजना लागू व्हावी म्हणून काढण्यात येणाऱ्या पेन्शन क्रांती महामोर्चात जिल्ह्यातील खाजगी शाळातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आव्हान महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे यांनी केले आहे .
श्री.भरत रसाळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सर्व शिक्षक आणि सरकारी – निम सरकारी कर्मचारी यांना 1982 ची जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे . महाराष्ट्र शासन सुधारित पेन्शन योजनेच्या नावाखाली फसवी पेन्शन योजना सरकारी कर्मचारी आणि शिक्षक यांच्यावर माथी मारु इच्छित आहे . हे आम्हा शिक्षक – कर्मचाऱ्यांना सगळ्यांना मंजूर नाही. 1982 ची जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी लागू व्हावी म्हणून गेल्या पंधरा वर्षापासून राज्यभरामध्ये आणि देशभरामध्ये अनेक वेळा आंदोलने झालेली आहेत. पण शासन याची दखल घेत नाही. त्यामुळे शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये प्रचंड असंतोष आहे. हा असंतोष व्यक्त करण्यासाठी आणि 1982 ची जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी लागू होण्यासाठी शनिवार दिनांक 17 सप्टेंबर 2024 रोजी पेन्शन क्रांती महामोर्चा काढणार आहे. हा महामोर्चा संग्राम उद्यान टाऊन हॉल ते जिल्हाधिकारी कार्यालय असा असणार आहे . तेव्हा जिल्ह्यातील खाजगी शाळातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी शाळा सुटल्यानंतर शंभर टक्के या मोर्चामध्ये सहभागी व्हावे आणि आपल्या ज्वलंत प्रश्न साठी ठाम उभे रहावे असे आवाहन भरत रसाळे यांनी केले आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930