नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , गारगोटीत ‘ठेवा आठवणींचा’ सांगीतिक कार्यक्रमाचे रविवार दि. १८ ऑगस्ट रोजी आयोजन – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

गारगोटीत ‘ठेवा आठवणींचा’ सांगीतिक कार्यक्रमाचे रविवार दि. १८ ऑगस्ट रोजी आयोजन

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

गारगोटीत ‘ठेवा आठवणींचा’ सांगीतिक कार्यक्रमाचे रविवार दि. १८ ऑगस्ट रोजी आयोजन

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
गारगोटीतील स्वरधारा संगीत विद्यालयाच्यावतीने श्रावण महिन्याचा आनंद द्विगुणित करण्यासाठी ‘ठेवा आठवणींचा’ या कार्यक्रमाचे रविवार दि. १८ ऑगस्ट रोजी सायं. ४:४५ वा. आयोजन करण्यात आले आहे. गारगोटी व परिसरातील संगीत प्रेमीसाठी स्वरधारा संगीत विद्यालयातर्फे दरवर्षी श्रावणात सांगीतिक कार्यक्रम आयोजित केला जातो. वर्षभरामध्ये कला – सांस्कृतिक क्षेत्रातील निधन पावलेल्या व्यक्तींना आदरांजली म्हणून हा कार्यक्रम आयोजित केला जातो. फेब्रुवारी २०२४ मध्ये बिनाका गीतमालाचे सुप्रसिद्ध निवेदक अमीन सयानी यांचे निधन झाले. आदरांजली म्हणून संगीत, कला, सांस्कृतिक क्षेत्रातील अशा निधन पावलेल्या व्यक्तींच्या आठवणींचा ठेवा यानिमित्ताने जपावा या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित केला आहे.
भक्तीगीते, मराठी-हिंदी चित्रपट गीते असे कार्यक्रमाचे स्वरूप असून यासाठी मंगेश सारंग (कीबोर्ड) विक्रम परीट (ढोलक, कोंगो) ज्ञानेश कोळी (तबला, बोंगो) रोहन मस्के( ऑक्टोपॅड) अशी संगीत साथ लाभणार आहे. संगीत, कला क्षेत्रातील काही मान्यवरांचा सत्कारही यावेळी आयोजित केलेला आहे.
श्री.इंजुबाई सांस्कृतिक भवन, गडहिंग्लज रोड, गारगोटी येथे रविवार सायं. ४:४५ वाजता हा कार्यक्रम आयोजित केला आहे. सर्व कला – संगीत प्रेमींनी या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन स्वरधारा संगीत विद्यालयाच्यावतीने श्री.राम गव्हाणकर यांनी केले आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930