नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , ‘एक राखी लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकार बंधूंसाठी’ – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

‘एक राखी लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकार बंधूंसाठी’

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

‘एक राखी लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकार बंधूंसाठी’

प्रायव्हेट हायस्कूलमध्ये पत्रकार गुणगौरव रक्षाबंधन सोहळा संपन्न

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कोल्हापूर
१४० वर्षाची शैक्षणिक परंपरा असलेल्या प्रायव्हेट हायस्कूल कोल्हापूर मध्ये ‘एक राखी लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकार बंधूंसाठी’ रक्षाबंधनाचा कार्यक्रम व पत्रकारांचा गुणगौरव समारंभ नुकताच संपन्न झाला यासाठी एनसीसीच्या एअर विंग आणि आर्मी बटालियन तसेच नुकत्याच १८ वी राज्यस्तरीय रोलबॉल स्पर्धा विजेत्या विद्यार्थिनीनी उपस्थित पत्रकारांना व संस्थेतील पदाधिकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना राखी बांधून त्यांचे औक्षण केले.
प्रतिवर्षी प्रशालेमध्ये राखी तयार करण्याची कार्यशाळा घेतली जाते आणि तयार झालेल्या राख्या सीमेवरील जवानांना पाठवल्या जातात गेल्यावर्षीपासून रक्षाबंधनाचा कार्यक्रम प्रशालेत साजरा केला जातो यासाठी दरवर्षी विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या बंधूंचे राखी बांधून औक्षण केले जाते गेल्या वर्षी मीडियातील विविध छायाचित्रकारांचा गौरव करून त्यांना राखी बांधली यावर्षी सर्व मीडियातील शिक्षण विभागात काम करणाऱ्या पत्रकारांचा गुणगौरव करून राखी बांधून औक्षण करण्यात आले. कला विभाग प्रमुख प्रशांत जाधव यांच्या संकल्पनेतून व प्रभारी मुख्याध्यापक गिरीश जांभळीकर यांच्या मार्गदर्शनाने हा उपक्रम राबविण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे नियमक मंडळाचे चेअरमन श्री.उदय सांगवडेकर, व्हाईस चेअरमन डाॅ. सुनील कुबेर, नियामक मंडळाचे ज्येष्ठ सदस्य अरुण डोंगरे, कार्यवाह सौ.शरयू डिंगणकर, कोषाध्यक्ष गिरीश जांभळीकर यांच्या हस्ते उपस्थित पत्रकारांचा सन्मानपत्र, स्नेहभेट व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी जेष्ठ पत्रकार श्री. सतीश घाटगे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रशालेतील अशा उपक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा व्यक्त केल्या. या प्रसंगी बुलढाणा येथे आयोजित १८ वी राज्यस्तरीय रोल बॉल स्पर्धेत प्रशालेच्या विजेत्या मुलींच्या संघाचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन व प्रास्ताविक पर्यवेक्षक प्रसन्न जोशी यांनी केले. आभार जिमखाना प्रमुख संतोष गानबावले यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यास दिलीप पाटील, राजेंद्र जाधव, जगदीश जोशी, डी.एम.रेडेकर, सुनील गोंधळी, श्रीमती एस.एस.माने यांचे विशेष योगदान लाभले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेमाची व आपल्या सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या बंधू भावाच्या प्रेमाची राष्ट्रीय एकात्मतेची प्रेरणा मिळाली. या कार्यक्रमास संस्थेचे पदाधिकारी शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी ,विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031