नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न एक दिवस निश्चितच पूर्ण करेन : नेमबाजपटू स्वप्निल सुरेश कुसाळे – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न एक दिवस निश्चितच पूर्ण करेन : नेमबाजपटू स्वप्निल सुरेश कुसाळे

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न एक दिवस निश्चितच पूर्ण करेन : नेमबाजपटू स्वप्निल सुरेश कुसाळे

कोल्हापुरात जंगी स्वागत, हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कोल्हापूर
कुठल्याही गोष्टीचं वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही. ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्याचे माझे स्वप्न असून एक दिवस ते निश्चितच पूर्ण करेन, असे उदगार पॅरिस ऑलम्पिकमधील नेमबाजी स्पर्धेत ब्रांझ पदक विजेता व कोल्हापूरचा नेमबाजपटू स्वप्निल सुरेश कुसाळे यांनी काढले. स्वप्निल कुसाळे याचे कोल्हापुरात जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांच्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली.
पॅरिस ऑलिंपिकमध्ये ब्रांझ पदक प्राप्त केल्यानंतर स्वप्निल कुसाळे यांचे आज बुधवारी २१ ऑगस्ट रोजी कोल्हापुरात आगमन झाले. जिल्हा प्रशासनाच्या पुढाकारातून ऑलम्पिक पदक विजेत्या या नेमबाजपटूचे कोल्हापुरात जंगी स्वागत करण्यात आले. छत्रपती ताराराणी चौक ते दसरा चौकापर्यंत जंगी मिरवणूक काढण्यात आली. पदक विजेत्या खेळाडूवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. दसरा चौक येथे जंगी सत्कार केल्यानंतर स्वप्निल कुसाळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्याचा कांबळवाडी ते पॅरिस ऑलिंपिक पदक विजेतेपर्यंतचा प्रवास उलघडला.
कोल्हापुरातील जंगी सत्काराने भारावलेले नेमबाजपटू स्वप्नील कुसाळे म्हणाले, कोल्हापूरकरांनी केलेले जंगी स्वागत, भव्य मिरवणूक हे सारे माझ्यासाठी अनपेक्षित, सुखद आहे. कोल्हापूरकरांचे प्रेम आणि पाठिंबा पाहून भारावून गेलो. हे सारं खूप छान वाटतंय. साऱ्यांचा मी मनापासून आभारी आहे. खूप खूप आभार. जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासनाने उत्कृष्ट नियोजन केले.
या सत्कारप्रसंगी पालकमंत्री, आमदार, खासदार विविध संस्थांचे पदाधिकारी, अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पॅरिस ओलंपिकमध्ये ५० मीटर थ्री पोझिशनमध्ये पदक जिंकल्याचा अनुभव कसा होता या प्रश्नावर स्वप्निल म्हणाले, थ्री पोझिशनच्या प्रत्येक प्रकारात तयारी करावी लागते. प्रत्येक पोझिशन हा महत्त्वाचा असतो. स्पर्धेतील अनुभव तर खूप काही वेगळा होता. माझी स्पर्धा सुरू असताना माझ्यासोबत असलेले खेळाडू, प्रशिक्षक व इतरांनी मला जे प्रोत्साहन दिले त्यामुळे माझा हुरूप प्रत्येक मिनिटाला वाढत होता. प्रत्येक इव्हेंटसाठी मला जो पाठिंबा देत होते, प्रोत्साहित करत होते ते सारं खूप मोलाच ठरलं. यामुळे प्रत्येक इव्हेंटला चांगला खेळ झाला. खेळामध्ये गेम प्लॅन महत्त्वाचा असतो. माझ्या प्रशिक्षकांनी उत्तम तयारी करून घेतली होती.
कोल्हापूरातही ऑलिंपिकच्या धर्तीवर सगळ्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे मंत्री महोदयांनी सांगितले. खेळ कोणताही असू दे खेळाडूंना सुविधा आवश्यक आहेत. खेळाडूंना सेवा सुविधा मिळाल्या तर खेळाडू महाराष्ट्राचा नाव उंचावतील.खेळाला सरकारचे पाठबळ आहे .माझ्या आतापर्यंतच्या वाटचालीत क्रीडा प्रबोधिनीचाही वाटा मोठा आहे. स्वप्निल पुढे म्हणाला, आई-वडिलांनी पहिल्यापासून माझ्या खेळाला प्रोत्साहन केले. खेळासाठी मला त्यांनी काहीही कमी पडू दिले नाही. त्यांनी मला नेहमीच प्रोत्साहित केले. तू सतत खेळत रहा, खेळामध्ये हार-जीत होत असते, पण खेळणं महत्त्वाचं हा सल्ला दिला. माझं स्वप्न हे ऑलम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकाविण्याचे आहे. एक दिवस मी ते निश्चितच साध्य करेन अशा शब्दात त्यांनी आपले पुढील ध्येय स्पष्ट केले. विविध क्रीडा प्रकारातील नवोदित खेळाडूंना काय काय सांगू शकाल या प्रश्नावर बोलताना स्वप्निल कुसाळे म्हणाले, कुठल्याही गोष्टीचा वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही.
पत्रकार परिषदेला प्रशिक्षक दिपाली देशपांडे, स्वप्निल कुसाळेचे वडील शिक्षक सुरेश कुसाळे, प्राचार्य महादेव नरके आदी उपस्थित होते

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031