नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , जिल्हा परिषदेसह खासगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळा व परिसरात सीसीटीव्ही बसवावेत : जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या सूचना – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

जिल्हा परिषदेसह खासगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळा व परिसरात सीसीटीव्ही बसवावेत : जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या सूचना

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

जिल्हा परिषदेसह खासगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळा व परिसरात सीसीटीव्ही बसवावेत : जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या सूचना

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कोल्हापूर
जिल्हा परिषदेसह खासगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळा व परिसरात सीसीटीव्ही बसवावेत अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या आहेत. तसेच सर्व शाळेत तक्रारपेटी बसविण्याबाबतही सूचना करण्यात आली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक झाली. या बैठकीत अधिकपटाच्या जिल्हा परिषद शाळांमध्ये तसेच उर्वरित सर्व शाळांमध्ये सी.सी.टी.व्ही. बसविणे कामी येणारा खर्च हा देण्यात येणाऱ्या चार टक्के अनुदान, समग्र शिक्षा शाळा अनुदान, तसेच सी.एस.आर. व लोकसहभागमधून करावा. शाळांमध्ये सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविलेनंतर आवश्यकतेनुसार ठराविक अंतराने त्याचे फुटेज तपासणे आवश्यक आहे. काही आक्षेपार्ह बाबी आढळल्यास कारवाई करावी. त्याची जबाबदारी मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समितीची राहील. फुटेजमध्ये काही आक्षेपार्ह बाबी आढळलेस याबाबत स्थानिक पोलिस प्रशासनाशी संपर्क साधून योग्य ही कार्यवाही करावी अशा सूचना आहेत.
प्रत्येक आठवड्याच्या शेवटच्या दिवशी पोलीस पाटील, पालक, विद्यार्थी यांच्यासमोर तक्रार पेटी उघडावी. महिला कर्मचारी-महिला पालकांसमोर मुख्याध्यापकांनी तक्रारपेटी उघडावी व त्याचे व्हिडीओ शूटींग करावे. गंभीर स्वरूपाच्या तक्रारीबाबत आवश्यक असल्यास पोलीस यंत्रणेचे सहाय्य घ्यावे. याबाबत केंद्रप्रमुखांनी केंद्रातील शंभर टक्के शाळांची व्हिडीओ शूटींगची पहाणी करावी. शिक्षण विस्तार अधिकारी यांनी दहा शाळांची व्हिडीओ शूटींगची पहाणी करावी. तसेच गटशिक्षणाधिकाऱ्यांनी पाच शाळांची व्हिडीओ शूटींगची पहाणी करावी असे ठरले. तसेच सर्व शाळेत सखी सावित्री समिती स्थापन करावी अशा सूचना करण्यात आल्या आहेत. बैठकीला प्राथमिक शिक्षणाधिकारी सौ.मीना शेंडकर यांच्यासह शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930