नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , भुदरगडच्या जंगलात भारतातील सर्वात मोठ्या चंद्र पतंगाचे दर्शन – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

भुदरगडच्या जंगलात भारतातील सर्वात मोठ्या चंद्र पतंगाचे दर्शन

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

भुदरगडच्या जंगलात भारतातील सर्वात मोठ्या चंद्र पतंगाचे दर्शन

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी (सायली मराठे)
अतिशय दुर्मिळ असणारा सर्वात मोठा चंद्र पतंग आज भुदरगडच्या जंगलात वाईल्ड लाईफ फोटोग्राफर विजय पाटील व निसर्ग मित्र, पत्रकार इंद्रजीत मराठे यांना कोषा अवस्थेत आढळून आला.
निसर्गाच्या अफाट पसाऱ्यामध्ये एक संगती आहे. वर वर पाहता विखुरलेले वाटणारे यातले घटक एकमेकांशी घट्टपणे जोडलेले आहेत. इतकेच नव्हे तर प्रत्येक घटकाचे एक विशिष्ठ स्थान ठरलेलं आहे, कारण त्या स्थानावर त्याला एक ठराविक भूमिका बजावायची असते. यातूनच निसर्गातल्या बहुविधतेचा जन्म झाला. याचं एक नेहमी दिसणारं उदाहरण म्हणजे, फुलझाडांमधील काही झाडे रात्री फुलतात. आता या रात्री फुलणाऱ्या झाडांचे परागीभवन म्हणजे बीज प्रसार कोण करणार? त्यासाठी निसर्गात रात्री उडणारी फुलपाखरे अस्तित्वात आली. या रात्री उडणाऱ्या फुलपाखरांना आपण ‘पतंग’ म्हणून ओळखतो. या पतंगांची शरीर रचना काही सूक्ष्म फरक सोडले तर फुलपाखरांशी अगदी मिळती जुळती असते, त्यामुळे अनेकदा यांना फुलपाखरू समजण्यात येते. फुलपाखरांचे मागचे आणि पुढचे पंख सुटे, स्वतंत्र असतात, तर पतंगांमध्ये हे पंख एका लहानशा हुकने जोडलेले असतात.
पतंग हे साधारणतः फुलपाखरांसारखे दिसतात. मात्र ते आकाराने मोठे, निशाचर असतात ते सायंकाळी किंवा रात्रीच प्रवास करतात.
भुदरगडच्या जंगलात आढळलेल्या पतंगाची लांबी रुंदी 12 ते 15 सेंटिमीटर ची असून ती मादी आहे आणि ती सध्या कोषा अवस्थेत असून अंडी उबवण्याचे काम करत आहे. लवकरच यातून आळ्या निघून अनेक पतंग तयार होतील. आतापर्यंत भुदरगडच्या जंगलामध्ये महाराष्ट्र राज्य प्राणी शेकरू, राज्य पक्षी हरियाल, राज्य फुल ताम्हण त्याचबरोबर विविध प्रजातीची झाडे, फुले, प्राणी,पक्षी आढळले आहेत. त्याचबरोबर या पतंगाच्या दर्शनामुळे येथील सृष्टी सौंदर्यात भर पडली आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930