नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , कागल येथे बनणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्केटिंग ग्राउंड : पालकमंत्र्यांनी दिला हिरवा कंदील – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

कागल येथे बनणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्केटिंग ग्राउंड : पालकमंत्र्यांनी दिला हिरवा कंदील

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

कागल येथे बनणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्केटिंग ग्राउंड : पालकमंत्र्यांनी दिला हिरवा कंदील
ज्ञानप्रबोधिनी स्केटिंग क्लबच्या वतीने पाठपुरावा

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कागल
कागल येथे आंतरराष्ट्रीय दर्जाची स्केटिंग रिंग (स्केटिंग ग्राऊंड) व्हावे या मागणीसाठी ज्ञानप्रबोधिनी स्केटिंग क्लबच्या सर्व खेळाडू व पालकांच्यावतीने राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. हसन मुश्रीफ यांना निवेदन देण्यात आले. यासाठी पालकमंत्र्यांनी हिरवा कंदील दिला आहे.
ज्ञानप्रबोधिनी स्केटिंग क्लबच्या वतीने पालकमंत्री नाम. हसन मुश्रीफ यांना कागल येथे शिष्टमंडळाद्वारे निवेदन देण्यात आले. स्केटिंग या ऑलिम्पिक खेळाचे शास्त्रशुद्ध व तंत्रशुद्ध मार्गदर्शन गेल्या दहा-बारा वर्षांपासून ज्ञानप्रबोधिनी स्केटिंग क्लबच्या मार्फत कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी, मुरगुड व कागल येथे सुरू असून शालेय शासकीय स्पर्धांबरोबरच अनेक जिल्हा, राज्य, राष्ट्रीय स्पर्धामध्ये खेळाडू कौशल्य पणाला लावत आहेत व या स्पर्धातून कोल्हापूर जिल्ह्याचे नाव देशपातळीवर चमकावत आहेत. त्याचबरोबर गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, लिमका बुक ऑफ रेकॉर्ड, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड बुक करणारे खेळाडू घडले आहेत.
सध्या सदर खेळाच्या सरावासाठी ग्राउंड उपलब्ध नसल्यामुळे स्केटिंग खेळाडू खुल्या रोडवर खेळाचा सराव करत आहे. राज्य, राष्ट्रीय स्पर्धेचा विचार करता स्पर्धेपूर्वी ह्या सर्व मुलांना स्केटिंग रिंगच्या अभावामुळे बेळगाव, पुणे या ठिकाणी स्केटिंग रिंक चा सराव करण्यासाठी जावे लागते. ते फार खर्चिक व वेळखाऊ असल्यामुळे त्रासदायक ठरत आहेत. स्केटिंग या ऑलिम्पिक खेळामध्ये जिल्ह्यातील खेळाडू घडण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्केटिंग रिंग ची आवश्यकता आहे. या मागणीसाठी ज्ञानप्रबोधिनी स्केटिंग क्लबच्या सर्व खेळाडू व पालकांमार्फत वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. हसन मुश्रीफ यांना निवेदन देण्यात आले. त्यांनी याला हिरवा कंदील दाखवला असून आंतरराष्ट्रीय स्केटिंग ग्राऊंड बनवण्यासंदर्भात कारवाईचे आदेश तात्काळ देण्यात आले आहेत.
यावेळी कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष नितीन दिंडे, कागल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहराध्यक्ष संजय चितारी, स्केटिंग प्रशिक्षक इंद्रजीत मराठे, पालक अमित हावलदार, सागर मोरबाळे, संतोष पोवार, प्रवीण पाटील, निलेश गांगरकर, सागर कोकाटे, दीपक घाटगे, युवराज पोवार, रोहन कांडेकरी, प्रतिभा पाटील, हर्षला हावलदार त्याचबरोबर मोठ्या संख्येने स्केटिंग खेळाडू उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930