नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , शिल्पकार सतीश घारगे यांचा कोल्हापूर आर्ट फाउंडेशनकडून सन्मान – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

शिल्पकार सतीश घारगे यांचा कोल्हापूर आर्ट फाउंडेशनकडून सन्मान

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

शिल्पकार सतीश घारगे यांचा कोल्हापूर आर्ट फाउंडेशनकडून सन्मान

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कोल्हापूर
येथील कसबा बावडा येथे नुकताच छत्रपती शिवरायांचा पुतळ्याचे प्रतिष्ठापना करण्यात आली हा छत्रपती शिवरायांचा पुतळा शिल्पकार सतीश घारगे यांच्या हस्त कौशल्यातून तयार करण्यात आला. त्यानिमित्ताने आमदार सतेज पाटील यांनी स्थापन केलेल्या कोल्हापूर आर्ट फाउंडेशनच्या कलावंताने शिल्पकार सतीश घारगे यांचा कार्याचा सन्मान करण्यात आला
या निमित्ताने दसऱ्याच्या शुभ दिनाचे औचित्य साधून कलानगरीतील सर्व कलावंत छत्रपतींच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यासाठी एकत्र आले होते याप्रसंगी कसबा बावड्यातील छत्रपतींच्या पुतळ्याचे समितीचे विश्वस्त मानसिंग जाधव यांनी सर्व कलाकारांचे छत्रपती शिवरायांच्या चरणी स्वागत केले. कोल्हापूर फाउंडेशनचे कार्यवाह प्रशांत जाधव यांनी शिल्पकार सतीश घारगे यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. कोल्हापूर आर्ट फाउंडेशनचे अध्यक्ष सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाने तसेच बावडेकरांच्या शिव भक्तीमुळे छत्रपती शिवरायांचे स्मारक नक्कीच सर्वांना प्रेरणादायी ठरेल असे सांगून शिल्पकाराच्या कर्तृत्वाविषयी माहिती सांगून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर प्राचार्य अजय दळवी विजय टिपूगडे यांनी आपली मनोगते व्यक्त केले.
शिल्पकार सतीश घारगे यांनी छत्रपतींच्या पुतळ्याच्या निर्मिती विषयी आपल्या भावभावना व्यक्त केल्या शेवटी पुतळा समितीचे विश्वस्त मानसिंग जाधव यांनी सर्वांचे आभार मानले. याप्रसंगी कोल्हापुरातील चित्रकार मोहम्मद अली मुजावर नागेश हंकारे विजय चोकाककर विजय उपाध्ये व इतर मान्यवर चित्रकार व शिवप्रेमी उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930