नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , निसर्गाचे संवर्धन हेच खरे सीमोल्लंघन : पर्यावरणमित्र अवधुत पाटील – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

निसर्गाचे संवर्धन हेच खरे सीमोल्लंघन : पर्यावरणमित्र अवधुत पाटील

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

निसर्गाचे संवर्धन हेच खरे सीमोल्लंघन : पर्यावरणमित्र अवधुत पाटील

आपटा व कांचन झाडांचे पूजन करुन दिला वृक्ष संवर्धनाचा संदेश

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
विजयादशमी दसरा सीमोल्लंघनात बहुगुणी असणाऱ्या आपटा व कांचन ह्या दुर्मिळ झाडांची मोठ्या प्रमाणात तोड होऊन आपट्याची पाने सोन्याचे प्रतीक म्हणून एकमेकास भेट दिली जातात. यामध्ये झाडांची बेसुमार कत्तल होते. यासाठी ह्या दुर्मिळ झाडांचे जतन व संवर्धन व्हावे ह्या हेतूने पर्यावरणमित्र अवधुत पाटील व कुटुंबियांकडून गेली सात वर्षे झाडांचे पूजन करून आपटा व कांचन वृक्ष जतन व संवर्धनाचा संदेश दिला जातो.
पर्यावरण संतुलन साधायचे असल्यास निसर्गातील झाड या घटकास अनन्यसाधारण असं महत्व आहे. पर्यावरण जतन व संवर्धनात अग्रस्थानी असणाऱ्या वृक्षांचे महत्वपूर्ण स्थान अधोरेखित करताना त्यांची लहान बाळाप्रमाणे काळजी घेऊन जोपासना करायला हवी. दैवतासमान असणारी ही झाडं अन्न, पाणी, वारा, निवारा, मायेची थंडगार सावली, उन्हाळ्यात हक्काचा विसावा तर देतातच शिवाय एकवेळ म्हातारपणी मुले आपल्याकडे दुर्लक्ष करतील पण झाडे आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपली साथ देतील. आजच्या आपटा व कांचन झाडांचे पूजन उपक्रमात पर्यावरणमित्र अवधुत पाटील, क्षितिज पाटील, मयुरी पाटील, जान्हवी पाटील, मिथाली पाटील, प्रणव पाटील आदींनी सहभाग घेतला
मानवाचा जंगलातील हस्तक्षेप झाडांच्या मुळावर..
…वृक्षतोड, वणवे, मानवाचा जंगल संस्कृतीतील वाढता हस्तक्षेप झाडांच्या मुळावर उठत आहे. विजयादशमी दसरा हा सण आपल्या भारत वर्षात सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होतो. सीमोल्लंघन दिवशी जंगलातून आपट्याच्या झाडांच्या फांद्या गावच्या मध्यवर्ती ठिकाणी मोकळ्या पटांगणात रचल्या जातात. सायंकाळी सर्व गावकरी एकत्र येत विधिवत पूजा करुन सोने (आपट्याची पाने) लुटतात. एकमेकांना नमस्कार करुन ही पाने वाटली जातात. परंपरेनुसार ही पाने भेट देताना, मोठ्या प्रमाणात आपटा व कांचन झाडांच्या फांद्यांची तोड होते.
होते हजारो झाडांची कत्तल..
…दसरा ह्या सणाच्या शुभदिनी हजारो झाडांची अक्षरशः कत्तल होते. पाने ओरबडली जातात. त्यामुळे हे असेच सुरु राहिले तर बहुगुणी असणारी आपटा व कांचन ही झाडे पृथ्वीतलावरुन नष्ट व्हायला, नामशेष व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळे सीमोल्लंघन दिवशी आपटा व कांचनची झाडे लावण्याबरोबरच झाडे भेट देऊयात, पानांच्या बदली एकमेकांना फुले देऊयात, थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घेऊयात. पर्यावरण जतन व संवर्धनात टाकलेले हे पाऊल मैलाचा दगड ठरेल यात शंका नाही.
– अवधुत पाटील, पर्यावरणमित्र

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031