नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , दिशा परिवार संस्थेच्यावतीने राजापूर तालुक्यातील २६ विद्यार्थ्यांना ७ लाख ३३ हजार शिष्यवृत्तीचे वाटप – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

दिशा परिवार संस्थेच्यावतीने राजापूर तालुक्यातील २६ विद्यार्थ्यांना ७ लाख ३३ हजार शिष्यवृत्तीचे वाटप

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

दिशा परिवार संस्थेच्यावतीने राजापूर तालुक्यातील २६ विद्यार्थ्यांना ७ लाख ३३ हजार शिष्यवृत्तीचे वाटप

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, राजापूर
पुणे येथील दिशा परिवार या संस्थेच्यावतीने चालू शैक्षणिक वर्षासाठी राजापूर तालुक्यातील सव्वीस विद्यार्थ्यांना ७ लाख ३३ हजार ५०० रुपयाच्या शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आहे.
यामध्ये अस्मिता वामन जाधव (BHMS) दापोली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज, दिप्ती दशरथ विश्वासराव (MBBS) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला, वैष्णवी प्रकाश खानविलकर ( B. Pharmacy) एएसपीएम कॉलेज ऑफ फार्मसी सांगुळवाडी, योजना संतोष तरल (GNM Nursing) ज्ञानेश्वरधिनी नर्सिंग कॉलेज, तळेरे, रोशनी सुहास गोंडाळ ( bachelor of Accounting and Finance) श्री.भाऊसाहेब वर्तक कॉलेज कला, कॉमर्स आणि सायन्स कॉलेज बोरिवली, मनस्वी दत्ताराम जोगले (BSc .IT) विद्या प्रसारक मंडळ आर झेड शहा कॉलेज मुलुंड, मुंबई, श्रावणी प्रसाद पळसुलेदेसाई (Msc. Biotechnology) गोगटे जोगळेकर महाविद्यालय,रत्नागिरी, सानिया शमसुद्दीन नाईक (Sy BSC) कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय लांजा, स्नेहल नितीन कणेरी (BHMS) लोकनेते ॲड दत्ता पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज वेंगुर्ला, दिव्या दशरथ कोंडविलकर (B.Tc.Ag) कॉलेज ऑफ अग्रिकल्चर इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी दापोली, अमृता सुरेश मांडवे(SY BA) (श्री. सिद्धीविनायक महिला महाविद्यालय पुणे, सानिका शेखर करंबेळकर GNM Nursing) गुरुनानक नर्सिंग स्कूल बांद्रा, हर्षदा मिलिंद ओगले (BSC Nursing) के. जे. सोमया कॉलेज ऑफ नर्सिंग ,तेजश्री जनार्दन डोबरे (GNM Nursing) गुरुनानक नर्सिंग स्कूल बांद्रा, दक्षिणा शशिकांत गुरव कॉलेज( GNM Nursing) श्रीमती सुनंदा प्रवीण गंभीरचंद कॉलेज ऑफ नर्सिंग, माटुंगा-मुंबई ,सानिका संतोष चव्हाण (BHMS) लोकनेते ॲड दत्ता पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज वेंगुर्ला. सानिका दशरथ कदम(BSC Nursing) यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग रत्नागिरी, साक्षी राजेश धुरी(BSC Nursing) कॉलेज ऑफ नर्सिंग माटुंगा मुंबई ,गीता बारक्या चव्हाण (BSC Nursing) नवनिर्माण कॉलेज ऑफ नर्सिंग, लोवळे, संगमेश्वर ,स्नेहाली शशिकांत जड्यार( GNM Nursing) परकार मेडिकल फाउंडेशन स्कूल ऑफ नर्सिंग रत्नागिरी. या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. पुणे येथील पंडित नेहरू सांस्कृतिक भवन येथे १८वा.शैक्षणिक शिष्यवृत्ती प्रदान कार्यक्रम करण्यात आला.
संस्थेचे कार्याध्यक्ष राजाभाऊ चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमात शिक्षणतज्ज्ञ श्रीपाद कुलकर्णी, भाऊसाहेब जाधव.बी.एल.स्वामी.खजिनदार अरूण कुलकर्णी, चिन्मय कुलकर्णी, रोजेकर, मकरंद कुलकर्णी आदी मान्यवरांसह राजापूरचे गजानन जोशी, अनंत रानडे, बी. के. गोंडाळ उपस्थित होते. यावर्षी राजापूर तालुक्यातील २३ दात्यांनी २ लाख ३८ हजार ५०१ इतकी रक्कम दिशा परिवारला देवून सहकार्य केले आहे. हा शिष्यवृत्ती प्रदान कार्यक्रम म्हणजे महाराष्ट्रातील, होतकरु गरिब मुलांसाठी दिशापरिवारने गेली १८ वर्षे राबवलेले हे पदवीधर शैक्षणिक अभियान आहे. बारावी नंतर पुढे कोणत्याही शाखेतून आपले करिअर करणार्‍या विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती दिली जाते. मागील काही वर्षात सुमारे १० विद्यार्थींनी आपले शिक्षण पूर्ण केले असून राजापूर तालुक्यातील विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी गजानन जोशी (९४०५९५५६३६), अनंत रानडे (९२०९५२६३३), बी. के. गोंडाळ (९५२९९८००७७) यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031