नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , वृक्षारोपण करून स्मशानभूमीत पक्ष्यांचा अधिवास निर्माण करण्याचा चौगले शिक्षक दाम्पत्यांचा पर्यावरण पूरक उपक्रम – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

वृक्षारोपण करून स्मशानभूमीत पक्ष्यांचा अधिवास निर्माण करण्याचा चौगले शिक्षक दाम्पत्यांचा पर्यावरण पूरक उपक्रम

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

वृक्षारोपण करून स्मशानभूमीत पक्ष्यांचा अधिवास निर्माण करण्याचा चौगले शिक्षक दाम्पत्यांचा पर्यावरण पूरक उपक्रम

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, निपाणी
यरनाळ (ता. निपाणी) येथील स्व. कमल रामचंद्र वास्कर यांचे स्मरणार्थ त्यांची विवाहित मुलगी, शिक्षिका सौ. अपुर्वा चौगुले यांचेकडून वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रत्येक गावच्या स्मशानभूमीत वृक्षारोपण करून, पक्ष्यांचा अधिवास निर्माण करणे आवश्यक असल्याचे मत वृक्षमित्र नामदेव चौगुले यांचे व्यक्त केले.
प्रत्येक गावची गरज आहे ती चांगल्या स्वच्छ आणि सुशोभित स्मशानभूमीची. गावातील प्रत्येकाने घरातील प्रिय व्यक्तिच्या मृत्यूनंतर धार्मिक विधी करण्यापेक्षा किंवा नातेवाईकाना भेट म्हणून भांडी, वस्तू देण्याऐवजी,तसेच रक्षाविसर्जन नदीत न करता,आपल्या प्रिय व्यक्तीच्या स्मरणार्थ वृक्षरोपे भेट देऊन, वृक्षारोपण केल्यास त्या झाडाच्या रुपात ते जिवंत राहतील असे प्रतिपादन यावेळी बोलताना सृष्टी पर्यावरणवादी संघटनेचे संचालक नामदेवराव चौगुले यानी केले.
विद्यामंदिर, निपाणी शाळेच्या इंग्रजी विषय शिक्षिका सौ.अपूर्वा नामदेवराव चौगुले यांच्या मातोश्री कमल रामचंद्र वास्कर यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांचा पार्थिव शेतात दहन करणेत आला. रक्षाविसर्जन दिवशी शेताच्या बांधाला खड्डा काढून त्यात रक्षा टाकून त्यावर वडाचे रोप लावल्यात आले.
पाणी प्रदूषण होऊ नये, ही दक्षता घेतली. वैज्ञानिक दृष्टीकोन समाजाला देऊन उत्तरकार्यादिवशी २२५ वृक्षरोपे नातेवाईक आणि ग्रामस्थाना देऊन पर्यावरणपूरक उपक्रम साजरा केला. समाजाला नवी दिशा कृतीतून देण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान ३० नोव्हेंबर रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत दहा ते अकरा फुट उंचीची, वड, पिंपळ, उंबर, जांभूळ अशी भारतीय वंशाची पंचवीस झाडे यरनाळ (ता.निपाणी) येथील स्मशानभूमीत लागवड करून पक्ष्यांसाठी अधिवास निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
पर्यावरण रक्षणासाठी झाडे लावून वसुंधरा हिरवी करण्याची जबाबदारी सर्वांची आहे, असे मत सौ. अपूर्वा नामदेवराव चौगुले यांनी यावेळी व्यक्त केले.
चौगुले शिक्षक दाम्पत्याच्या या पर्यावरण कार्याचे यरनाळ ग्रामस्थातून कौतुक होत आहे.
याप्रसंगी दिग्विजय निंबाळकर ,सुरेश घाटगे,यांनीही आपल्या मनोगतातून वृक्षसंवर्धन करून स्मशानभूमी सुंदर आणि आदर्श बनवण्याचे अभिवचन दिले.
याप्रसंगी ग्रामपंचायत अध्यक्षा आक्काताई कांबळे, दौलतराव निंबाळकर, सिद्धोजीराव निंबाळकर, गुलाबराव निंबाळकर, अमरसिंह निंबाळकर, सुरेश घाटगे, राजेंद्र घाटगे, दिनकर लाटकर, अशोक इंजल, पांडुरंग पोवार आदी उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930