नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , भारतातील सर्वात लहान गिर्यारोहक कोल्हापूरचा साम्राज्य मराठे करणार सह्याद्रीतल्या सर्वात अवघड, अतिशय कठीण अभेद्य गगनाला भिडणाऱ्या लिंगाणा सुळक्यावर चढाई – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

भारतातील सर्वात लहान गिर्यारोहक कोल्हापूरचा साम्राज्य मराठे करणार सह्याद्रीतल्या सर्वात अवघड, अतिशय कठीण अभेद्य गगनाला भिडणाऱ्या लिंगाणा सुळक्यावर चढाई

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

भारतातील सर्वात लहान गिर्यारोहक कोल्हापूरचा साम्राज्य मराठे करणार सह्याद्रीतल्या सर्वात अवघड, अतिशय कठीण अभेद्य गगनाला भिडणाऱ्या लिंगाणा सुळक्यावर चढाई

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यातील साम्राज्य मराठे हा भारतातील सर्वात लहान गिर्यारोहक असून त्याने सह्याद्रीतील अतिउच्च कळसुबाई शिखर अवघ्या पावणे दोन वर्ष वय असताना सर केले आहे. आणि आता तो सज्ज झाला आहे स्वराज्याच्या अभेद्य असणाऱ्या गगनाला भिडणाऱ्या लिंगाणा सुळक्यावर चढाई करण्यासाठी. हा साधा सुधा सुळका नसून ७० ते ८० डिग्री मध्ये उभा असणारा,भल्याभल्यांना घाम फोडायला लावणारा, स्वराज्याचे कारागृह, महाराष्ट्रातील सर्वात अवघड किल्ला……
जो क्लाइंबिंग, रॅपलिंग करत सर करावा लागतो आणि हे अतिशय अवघड चढाईचे आव्हान पूर्ण करणार आहे कोल्हापूरचा साम्राज्य मराठे हा अवघ्या पावणे चार वर्षांचा चिमुकला…. यासाठी तो सातत्याने रॅपलिंग आणि रोप क्लाइंबिंगचा सराव सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात त्याच्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली करत आहे.
येत्या ४ जानेवारी च्या पहाटे ३:३० वाजता तो मोहरी गावातून ट्रेकिंगला सुरुवात करेल. रायलिंग पठार, अवघड अशी बोराट्याची नाळ पार करत… सकाळी ६:०० वाजता लिंगाणा आरोहण मोहिमेला सुरुवात होईल आणि सुरू होईल थरारक अशा अभेद्य लिंगाणा सुळक्यावरील रॅपलिंग-क्लाइंबिंगच्या कसरतीला…. आणि साम्राज्य मराठे एक नवा इतिहास घडवेल.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031