नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावणे हेच माझे उद्दिष्ट : आमदार प्रा जयंत आसगावकर – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावणे हेच माझे उद्दिष्ट : आमदार प्रा जयंत आसगावकर

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावणे हेच माझे उद्दिष्ट : आमदार प्रा जयंत आसगावकर

आ.आसगावकर यांची भुदरगड तालुक्यातील शाळांना सदिच्छा भेट

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
शिक्षक आमदार म्हणून मी तुमच्या पाठीशी असून त्यात कोठेही कमी पडणार नाही. ‘एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व’ या युक्तीप्रमाणे माझे काम सुरू असून भविष्यात शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावणे हेच माझे उद्दिष्ट असेल, असे उदगार शिक्षक आमदार प्रा जयंत आसगावकर यांनी काढले.
‘आमदार आपल्या दारी’ या अभियानांतर्गत भुदरगड तालुक्यातील माध्यमिक शाळांना दुसऱ्या टप्प्यातील सदिच्छा भेटी प्रसंगी आमदार जयंत आसगावकर गारगोटी येथे संघटना प्रतिनिधींच्या बैठकीत बोलत होते. यावेळी मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आ.आसगावकर म्हणाले, माझा आमदार फंड केवळ शाळांसाठीच वापरला असल्यामुळे आजअखेर मतदारसंघातील पाच हजारहून अधिक शाळांना शैक्षणिक साहित्य दिले आहे. यापुढे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळा डिजिटलायझेशन करणार आहोत.
‘शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी सदैव तत्पर’ असणाऱ्या आमदार जयंत आसगावकर यांनी दुसऱ्या टप्प्यात भुदरगड तालुक्यातील विविध शाळांना सदिच्छा भेट दिली. ‘आमदार आपल्या दारी’ या अभियानांतर्गत आमदार जयंत आसगावकर यांनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे.
आमदार जयंत आसगावकर यांनी दिवसभरात न्यू इंग्लिश स्कूल, पाल कुमार भवन पांगिरे, पिंपळगाव विद्यालय पिंपळगाव, लक्ष्मी माध्यमिक विद्यालय, बेगवडे, शंकर चक्रु पाटील माध्यमिक विद्यालय दिंडेवाडी, माध्यमिक विद्यालय बारवे, शंकरराव देसाई हायस्कूल म्हसवे, जवाहर हायस्कूल निळपण, आर. व्ही. देसाई माध्यमिक विद्यालय मिणचे खुर्द, स्वा. वि. दा. सावरकर माध्यमिक विद्यालय मिणचे बुद्रुक, महात्मा फुले हायस्कूल कोळवण, वत्सलाताई पाटील गर्ल्स हायस्कूल व जुनिअर कॉलेज गारगोटी, श्री.मौनी महाराज (बनारस) हायस्कूल गारगोटी, न्यू इंग्लिश स्कूल मांगनूर या शाळांना सदिच्छा भेट दिली.
गारगोटी येथे झालेल्या संघटना प्रतिनिधींच्या बैठकीत शिक्षक संघाचे अध्यक्ष अभिजित पोवार, शिक्षक परिषदेचे अध्यक्ष अजित तोरस्कर, शिक्षकेत्तर संघटनेचे अध्यक्ष वजीर मकानदार, बबन इंदुलकर, प्रकाश पाटील, प्रकाश सांडूगडे, नामदेव खापरे, डॉ. आर. डी. पोवार, युवराज नाईक आदींनी चर्चेत सहभाग घेतला.
यावेळी जिल्हा संस्थाचालक संघाचे संचालक के. ए. देसाई, कोजिमाशीचे माजी चेअरमन एच. आर. पाटील, एस. के. कासार, एन.जी.कांबळे, प्रवीण नलवडे, ग्रंथपाल संघटनेचे मारुती भराडे आदी उपस्थित होते. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक जिल्हा मुख्याध्यापक संघाचे व्हाईस चेअरमन मिलिंद पांगिरेकर यांनी तर आभार मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष सुरेश पाटील यांनी मानले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930