नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या शासनमान्य संस्थेत वन्यजीव संरक्षण व संवर्धन कार्यशाळा संपन्न – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या शासनमान्य संस्थेत वन्यजीव संरक्षण व संवर्धन कार्यशाळा संपन्न

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या शासनमान्य संस्थेत वन्यजीव संरक्षण व संवर्धन कार्यशाळा संपन्न

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कोल्हापूर
    शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन कोल्हापूर (SMAK) संचलित श्रीमती सोनाबाई शं. जाधव मूलभूत प्रशिक्षण केंद्र (BTP) व स्वर्गीय जवानमलजी गांधी औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) शिरोली कोल्हापूर या दोन्ही शैक्षणिक संस्थेमधील एकत्र २०० विद्यार्थ्यांसाठी वन्यजीव संरक्षण व संवर्धन कार्यशाळा घेण्यात आली.
सदरची कार्यशाळा आयोजित करण्यासाठी स्मॅॅक संस्था अध्यक्ष, उपाध्यक्ष, स्मॅक सेक्रेटरी सर्व संचालक मंडळ, आयटीआय कमिटी चेअरमन, कमिटी सदस्य, तसेेच आयटीआय प्राचार्य व सर्व स्टाफ सर्वांचेच सहकार्य लाभले.
या कार्यशाळेसाठी वर्ल्ड फॉर नेचर टिमचे वन्यजीव संरक्षक अभिजीत वाघमोडे उपस्थित होते. या कार्यशाळेत वन्यजीवांचे महत्व व जैवविविधतेमधील त्यांची भूमिका तसेच सर्पांच्या विविध जातींची विस्तृत माहिती यावेळी देण्यात आली. यावेळी प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांच्या सर्व प्रश्नांचे व शंकांचे निरसन करण्यात आले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031