नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , स्वरधारा संगीत विद्यालयाचा संगीत परीक्षेचा निकाल १०० टक्के : निकालाची परंपरा कायम – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

स्वरधारा संगीत विद्यालयाचा संगीत परीक्षेचा निकाल १०० टक्के : निकालाची परंपरा कायम

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

स्वरधारा संगीत विद्यालयाचा संगीत परीक्षेचा निकाल १०० टक्के : निकालाची परंपरा कायम

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
येथील स्वरधारा संगीत विद्यालयाचा संगीत परीक्षेचा १०० टक्के निकाल लागला. डिसेंबर २०२४ मध्ये झालेल्या संगीत परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. स्वरधारा संगीत विद्यालयाने १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली.
यावर्षी घेण्यात आलेल्या हार्मोनियम वादनमध्ये श्रेयसी रणजित कुलकर्णी, लावण्या पाटील, नुपूर पेडणेकर, संचिता चव्हाण यांनी तर तबलावादन मध्ये सोहम कुलकर्णी, श्रेयस पोवार, गायनमध्ये श्रेयसी कुलकर्णी, लावण्या पाटील, संचिता चव्हाण, नुपूर पेडणेकर, निशिगंधा बाबर, अनुष्का जगताप, वरद घरपणकर, स्वरा चव्हाण, सानवी कुलकर्णी, विभावरी देसाई यांनी यश संपादन केले. संगीत विद्यालयातर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये इयत्ता १० वी, १२वी बोर्ड परीक्षेसाठी प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांना कला- क्रीडा विषयांतर्गत सवलतीचे वाढीव गुणांचा लाभ या विद्यार्थ्यांना होणार आहे.
तीन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना १० गुण तर पाच परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना १५ अतिरिक्त गुण मिळतात. विद्यार्थ्यांनी स्वरधारा संगीत विद्यालयात प्रवेश घेऊन संगीत कलेबरोबर वाढीव गुणांचाही लाभ घ्यावा,असे आवाहन संस्थेतर्फे सौ.अस्मिता रामकृष्ण गव्हाणकर यांनी केले आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930