नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , थकित बिलांचे प्रस्ताव तातडीने मार्गी लावण्याचे आमदार जयंत आसगावकर यांचे आदेश : शिक्षण उपसंचालकांसमवेत बैठक संपन्न – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

थकित बिलांचे प्रस्ताव तातडीने मार्गी लावण्याचे आमदार जयंत आसगावकर यांचे आदेश : शिक्षण उपसंचालकांसमवेत बैठक संपन्न

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

थकित बिलांचे प्रस्ताव तातडीने मार्गी लावण्याचे आमदार जयंत आसगावकर यांचे आदेश : शिक्षण उपसंचालकांसमवेत बैठक संपन्न

कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या उपसंचालकांना सूचना

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कोल्हापूर
कोल्हापूर विभागात मंजुरीसाठी असलेली अनेक बिले थकीत आहेत. याबाबत आमदार जयंत आसगावकर यांनी आज (शुक्रवारी) कोल्हापूर विभागीय शिक्षण उपसंचालक महेश चोथे, वेतन पथक अधीक्षक प्रवीण फाटक व नंदकिशोर भंडारी यांच्या सोबत तातडीची बैठक घेऊन थकीत बिलांच्या प्रस्तावाचा आढावा घेतला. या थकित बिलांचे प्रस्ताव तातडीने मार्गी लावण्याचे आदेश दिले. आमदार जयंत आसगावकर यांनी कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या उपसंचालकांना सूचना दिल्या.
आर्थिक वर्षाची समाप्ती जवळ आली असून केवळ तीनच दिवस शिल्लक राहिलेले आहेत, अशा परिस्थितीत कोल्हापूर विभागातील मंजुरीसाठी असलेली थकीत बिले पुढे पाठवण्यात आली नसल्याच्या तक्रारी आमदार जयंत आसगावकर यांच्याकडे आलेल्या होत्या. या पार्श्वभूमीवर आमदार जयंत आसगावकर यांनी बैठक घेऊन अधिकाऱ्यांकडून याबाबतचा खुलासा मागितला. यावेळी अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली. जे अधिकारी कामात हलगर्जीपणा करत असतील, तर अशांवर कडक ॲक्शन घ्या, अशा सूचना श्री.चोथे यांना केल्या. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी थकीत बिले वेळेत पाठवावी, कामासाठी येणाऱ्या शिक्षकांना सन्मानाची वागणूक द्यावी, असे आदेश दिले.
दरम्यान या बैठकीत आमदार जयंत आसगावकर यांनी भ्रमणध्वनीवरून पुणे शिक्षण संचालक कार्यालयातील अधिकारी श्री. दानी यांच्याशी संपर्क साधून थकीत बिले लवकरात लवकर मंजूर करण्याच्या सूचना दिल्या. काही कर्मचारी आधीच्या बिलांना मंजुरी न देता आयत्यावेळी आलेल्या बिलांना तातडीने मंजुरी देत जात असल्याची तक्रार काही शिक्षकांनी आमदार जयंत आसगावकर यांच्याकडे बैठकीत केली. अशा अधिकाऱ्यांना धारेवर धरत आमदार जयंत आसगावकर यांनी जाब विचारला. पुन्हा अशी चूक झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल. अशा अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचला, अशा सूचनाही उपसंचालक श्री.चोथे यांना दिल्या. ज्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची थकीत बिले आहेत, त्यांनी प्रवीण फाटक यांच्याशी संपर्क साधून मंजूर करून घ्यावीत, असे आवाहन आमदार जयंत आसगावकर यांनी केले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930