नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , अक्षरमित्र बी. के. गोंडाळ यांनी अक्षरमित्र स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात उभारली पुस्तकांची अनोखी गुढी – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

अक्षरमित्र बी. के. गोंडाळ यांनी अक्षरमित्र स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात उभारली पुस्तकांची अनोखी गुढी

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

अक्षरमित्र बी. के. गोंडाळ यांनी अक्षरमित्र स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात उभारली पुस्तकांची अनोखी गुढी

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, राजापूर
राजापूर तालुक्यातील जुवाठी येथील माध्यमिक विद्यालयातील शिक्षक, अक्षरमित्र बी. के. गोंडाळ यांनी गुढीपाडव्याचे औचित्य साधून त्यांच्या जुवाठी आनंदवनातील अक्षरमित्र स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रांमध्ये पुस्तकांची अनोखी गुढी उभी करण्याचा उपक्रम राबविला.
राजापूर तालुक्यातील ग्रामीण भागात वाचनसंस्कृती रुजवण्यासाठी स्वखर्चाने वाचनालये उभी करण्यासह समाज प्रबोधनाचे विविधांगी उपक्रम राबविणारे गोंडाळ यांच्या पुस्तकाची गुढी उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना देशपातळीवर चालणाऱ्या स्पर्धा परीक्षेची प्राथमिक स्तरावर माहिती व्हावी. तसेच ग्रामीण भागातून जास्तीत जास्त प्रशासकीय अधिकारी निर्माण होण्यासाठी स्वखर्चाने अक्षरमित्र स्पर्धा केंद्राची उभारणी केली आहे. त्यांच्या वाचनालय निर्मीती चळवळीची प्रेरणा घेवून अनेकांनी राजापूर तालुक्यात वाचनालय उभारणी केली आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू असलेली विधवा प्रथा बंद करण्यासाठी गोंडाळ यांनी विधवा मातांसोबत हळदीकुंकू व त्यासोबत प्रबोधनात्मक व्याख्यान ठेवून अशा उपक्रमातून ग्रामीण भागातील लोकांत मिसळून समाजप्रबोधन करत आहेत. महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारांचा वारसा आपल्या दैनंदिन कृतिशील जगण्यातून जपण्याचा
आपल्या स्तरावर प्रयत्न करत आहेत. तसेच ते राजापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील शाळाशाळामधून अक्षर सूधार उपक्रम घेत आहेत. यावेळी यावेळी उपस्थित महिलांमधून मालती गोंडाळ. सुनंदा मयेकर. वनिता मयेकर. निरंजनी मयेकर. सत्यवती महंकाळ व चंद्रभागा मयेकर या महिलांच्या हस्ते. दीपप्रज्वलन तर उपस्थित विद्यार्थ्यांमधून राखी मयेकर. आदीती सूर्यवंशी. सिद्धी मयेकर. मधूरा तेली. कार्तिकी लेंबरकर. जागृती भांबळे या विद्यार्थीनीं पुस्तक पुजन केले. गोडाळ यांनी यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना पूस्तक वाचण्याचे महत्त्व सांगितले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031