नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , *गावच्या स्वच्छतेसाठी तालुकास्तरीय ‘स्वच्छता रन’चा गारगोटीत शुभारंभ :*   *क्रांती ज्योत ते ग्रामीण रुग्णालयापर्यंत स्वच्छता दौड संपन्न*  – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

*गावच्या स्वच्छतेसाठी तालुकास्तरीय ‘स्वच्छता रन’चा गारगोटीत शुभारंभ :*   *क्रांती ज्योत ते ग्रामीण रुग्णालयापर्यंत स्वच्छता दौड संपन्न* 

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

 

*गावच्या स्वच्छतेसाठी तालुकास्तरीय ‘स्वच्छता रन’चा गारगोटीत शुभारंभ :*

*क्रांती ज्योत ते ग्रामीण रुग्णालयापर्यंत स्वच्छता दौड संपन्न*

गारगोटी प्रतिनिधी

स्वच्छ भारत अभियानांतर्गत गावच्या दृश्यमान स्वच्छतेसाठी तालुकास्तरीय ‘स्वच्छता रन’चा शुभारंभ गटविकास अधिकारी डॉ.शेखर जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. स्वच्छता ही सेवा या अभियानांतर्गत गारगोटी येथील क्रांती ज्योत ते ग्रामीण रुग्णालयापर्यंत स्वच्छता दौड काढण्यात आली.

स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत स्वच्छतेची शपथ व नंतर स्वच्छता दौड घेण्यात आली. यावेळी डॉ. जाधव यांनी स्वच्छता ही सेवा या अभियाना संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले व स्वच्छता रन यशस्वी पुर्ण केल्याबद्दल सर्वांचे कौतुक केले.

यावेळी ग्रामपंचायतीच्या सफाई कर्मचाऱ्यांचा तसेच स्वच्छता दूत म्हणून गारगोटी हायस्कूलच्या कु.पियुष सुतार, कु.प्रियांका देसाई यांचा सत्कार गट विकास अधिकारी डॉ.शेखर जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी एकात्मिक बालविकास योजनेच्या प्रकल्पाधिकारी सौ. शीतल पाटील, ग्रामविकास अधिकारी श्री.राजाराम परीट, गारगोटी हायस्कूल गारगोटीचे शिक्षक व विद्यार्थी, पंचायत समिती सर्व अधिकारी व कर्मचारी, बी.आर.सी/ सी.आर.सी, तसेच ग्रामपंचायत गारगोटीचे सर्व कर्मचारी व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

 

 

 

 

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031