नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , *कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीने शनिवार ३० सप्टेंबर रोजी काढण्यात येणाऱ्या धडक मोर्चात सहभागाचे मुख्याध्यापक संघाचे आवाहन* – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

*कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीने शनिवार ३० सप्टेंबर रोजी काढण्यात येणाऱ्या धडक मोर्चात सहभागाचे मुख्याध्यापक संघाचे आवाहन*

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

*कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीने शनिवार ३० सप्टेंबर रोजी काढण्यात येणाऱ्या धडक मोर्चात सहभागाचे मुख्याध्यापक संघाचे आवाहन*

 

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठांतर्गत येणाऱ्या सर्व संघटनांच्या वतीने पुणे विभाग शिक्षक आमदार प्रा.जयंत आसगावकर यांच्या नेतृत्वाखाली शनिवार दिनांक ३० सप्टेंबर २०२३ इ.रोजी दुपारी १२.०० वा. शासनाच्या खाजगीकरण, कंत्राटीकरण, समूह शाळा, अशैक्षणिक कामे या धोरणा विरोधात जाब विचारण्यासाठी व तसेच जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या धडक मोर्चात मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीने करण्यात आले आहे.

बहुजन समाजातील मुलांचे शिक्षण बंद करण्याचा हा कुटील डाव सरकारकडून होताना दिसतो आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार ६ ते १४ वयोगटातील मुलांना शिक्षण देण्याचा कायदा बंधनकारक असताना देखील यातून पळवाट काढून धन दांडग्यांच्या घशामध्ये शिक्षणासारखे पवित्र क्षेत्र देऊन गोरगरिबांच्या मुलांना गुलाम बनवण्याचा प्रयत्न शासन करत आहे.

शनिवार सकाळी शाळा घेवून (शाळा किती तासानंतर सोडावी हे आपण आपल्या शाळेपासून मोर्चा स्थळी पोहचण्यासाठी लागणाऱ्या वेळेवर निर्णय घ्यावा.) मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन मुख्याध्यापक संघाने केले आहे. याची पूर्व कल्पना आपल्या संस्थेला द्यावी.

शनिवार दिनांक ३० सप्टेंबर २०२३ इ.रोजी दुपारी १२ वाजता टाऊन हॉल, कोल्हापूर येथून मोर्चास सुरुवात होईल. दसरा चौक, व्हिनस कॉर्नर, बसंत बहार रोड ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा निघणार आहे.

 

 

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930