नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , *श्री.आनंदराव आबिटकर कला, वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात गांधी जयंती साजरी* – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

*श्री.आनंदराव आबिटकर कला, वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात गांधी जयंती साजरी*

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

*श्री.आनंदराव आबिटकर कला, वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात गांधी जयंती साजरी*

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कडगांव
युवा ग्रामीण विकास संस्था संचलित आनंदराव आबिटकर काॅलेज कडगांव (ता. भुदरगड) येथे गांधी जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी प्राचार्य गुरुप्रसाद शेणवी होते. यावेळी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
यावेळी बोलताना प्राचार्य गुरुप्रसाद शेणवी म्हणाले, महात्मा गांधींनी केवळ स्वातंत्र्यासाठीच संघर्ष केला नाही तर भारताला आत्मनिर्भर होण्याचा मार्गही दाखवला. त्यांचे विचार आजही समर्पक आहेत आणि भविष्यातही राहतील. भारत सरकारच्या स्वच्छता मोहिमेत आपण सहभागी व्हायला हवे. आपले घर आणि परिसर स्वच्छ ठेऊन आपण भारताच्या स्वच्छता मोहिमेला बळ देऊ शकतो. स्वच्छ भारत ही एक सामायिक जबाबदारी आहे. सगळ्यांनी सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
यावेळी प्रा. रोहित गुरव, प्रा.पाटील, प्रा.तेजम, प्रा.वैष्णव देसाई, प्रा.पोवार, प्रा.भुतल, सौ.डिसोजा, सौ.सुतार, सौ.काटकर, सागरिका पाटील, घाटगे, साळोखे,संयोगीता पाटील, कांबळे व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा.खवरे यांनी केले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031