नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , *खाजगी प्राथमिक शाळांचे वेतन राष्ट्रीयकृत बँकेतून होण्यासाठी शालार्थ प्रणालीत बँक निवडण्यास मान्यता द्यावी : भरत रसाळे* – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

*खाजगी प्राथमिक शाळांचे वेतन राष्ट्रीयकृत बँकेतून होण्यासाठी शालार्थ प्रणालीत बँक निवडण्यास मान्यता द्यावी : भरत रसाळे*

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

*खाजगी प्राथमिक शाळांचे वेतन राष्ट्रीयकृत बँकेतून होण्यासाठी शालार्थ प्रणालीत बँक निवडण्यास मान्यता द्यावी : भरत रसाळे*

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यांतील खाजगी प्राथमिक शाळांतील कर्मचाऱ्यांना राष्ट्रीयकृत बँकेतून पगार मिळण्यांसाठी शिक्षक, कर्मचाऱ्यांना शालार्थ प्रणालीमध्ये राष्ट्रीयकृत बँक निवडण्यास मुभा मिळावी व तशी सुविधा शालार्थ प्रणालीमध्ये उपलब्ध करून द्यावी अशी मागणी खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे यांनी राज्याचे शिक्षण आयुक्त श्री.सूरज मांढरे व शिक्षण संचालक (प्राथ ) श्री.शरद गोसावी यांचेकडे केली आहे. याबाबतचे निवेदन कोल्हापूर विभागाचे शिक्षण उपसंचालक श्री.महेश चोथे यांना देण्यात आले. यावेळी शिक्षण उपनिरीक्षक रविंद्रनाथ चौगुले उपस्थित होते .
माहे सप्टेंबरचे वेतन CMP प्रणाली मार्फत थेट संबंधितांच्या जिल्हा बँकच्या खात्यावर जमा करण्यात आलेल्याबद्दल शासनाचे व वेतन पथक (प्राथ.) कोल्हापूरचे अभिनंदन करण्यात आले.
शिक्षण आयुक्त व शिक्षण संचालक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रीयकृत बँकांनी पगारदार नोकरांसाठी ज्या विविध योजना तसेच सवलती लागू केलेल्या आहेत या सवलती जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत देण्यात अडचणी आहेत. त्यामुळे शिक्षकांना वेतन खाते काढलेमुळे मिळणारे अधिक लाभ घेण्यासाठी त्यांचे वेतन राष्ट्रीयकृत बँकेतून होणे गरजेचे आहे त्यासाठी शालार्थ प्रणालीमध्ये त्यांना राष्ट्रीयकृत बँक निवडण्यासाठी मान्यता द्यावी व तशा प्रकारची दुरुस्ती शालार्थ प्रणालीत करावी.
शिष्टमंडळात समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे यांच्यासह शिवाजी सोनाळकर, सर्जेराव नाईक, आप्पासाहेब वागरे, एस.एम. पाटील व विश्वजीत पाटील उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031