नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , *समृद्ध शालेय ग्रंथालय हे शाळेचे वैभव ठरण्यासाठी ग्रंथदान उपक्रम चळवळ झाली पाहिजे : जीवन साळोखे* – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

*समृद्ध शालेय ग्रंथालय हे शाळेचे वैभव ठरण्यासाठी ग्रंथदान उपक्रम चळवळ झाली पाहिजे : जीवन साळोखे*

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

*समृद्ध शालेय ग्रंथालय हे शाळेचे वैभव ठरण्यासाठी ग्रंथदान उपक्रम चळवळ झाली पाहिजे : जीवन साळोखे*

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कागल

वाचन प्रोत्साहनासाठी आणि शालेय ग्रंथालय समृद्ध होण्यासाठी शाळाशाळांतून ग्रंथदान उपक्रम राबविणे आवश्यक आहे. समृध्द शालेय ग्रंथालय हेच शाळेचे खरे वैभव आहे. त्यासाठी मुख्याध्यापक व शिक्षकांनी अधिक वाचते होवून विद्यार्थ्यांना वाचते करावे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक जीवन साळोखे यांनी केले.
म्हाकवे इंग्लिश स्कूल म्हाकवे (ता.कागल) येथे आपल्या ग्रंथदान उपक्रमांतर्गत हायस्कूल्सना पुस्तक संच वाटप समारंभप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक संघाचे माजी संचालक श्री. पी.व्ही. पाटील होते. यावेळी कागल तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री.ए.आर.खामकर, मंडलिक साखर कारखान्याच्या माजी संचालिका सौ.राजश्री चौगुले, हळदी हायस्कूलचे मुख्याध्यापक जी.के. भोसले, सत्संग समूहाचे श्रीकांत पाटील प्रमुख उपस्थित होते.
वाचन प्रोत्साहन आणि शालेय ग्रंथालय समृद्धी यासाठी ग्रंथदान उपक्रमांतर्गत जीवन साळोखे यांनी दिलेल्या, सुमारे दोनशे दर्जेदार पुस्तकांचे वाटप तालुक्यातील चिखली, कौलगे, खडकेवाडा, बाचणी, सुळकूड, मौजे सांगाव, कसबा सांगाव, आन्नूर, म्हाकवे येथील बारा हायस्कूल्सना उपस्थित मान्यवरांचे हस्ते यावेळी करण्यात आले.
प्रारंभी या ग्रंथदान समारंभाचे आयोजक म्हाकवे हायस्कूलचे मुख्याध्यापक पी.बी. भारमल यांनी उपस्थितांना पुस्तक भेट देवून सर्वांचे स्वागत व प्रास्ताविक करून ग्रंथदान उपक्रमाचे महत्त्व विशद केले.
आपल्या भाषणात ग्रंथदान उपक्रम अखंड सुरू ठेवणाऱ्या जीवन साळोखे यांनी, वाचन संस्कृती, ग्रंथप्रसार,वाचक संस्था यांचे महत्त्व विशद करून ते म्हणाले, सतत वाचन केल्याने स्वतःचे अज्ञान आपल्याला समजते. मात्र वाचन न केल्यास, त्याची उपेक्षा केल्यास आपले अज्ञान जगाला कळते. वाचनामुळे जगण्याला अर्थ प्राप्त होतो. आचार विचाराला योग्य दिशा मिळते.
यावेळी मुख्याध्यापक खामकर,पी.व्ही. पाटील, के.आर.पाटील यांनी मनोगते व्यक्त केली. याकार्यक्रमास सर्व संबंधित शाळा मुख्याध्यापक व स्टाफ उपस्थित होते. शेवटी आभार आर.आर.पाटील यांनी मानले. सूत्रसंचालन युवराज पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे नेटके संयोजन म्हाकवे इंग्लिश स्कूलच्या स्टाफने केले होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031