नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , *मिणचे खुर्द शिक्षण मंचच्या वतीने ‘संध्या अभ्यासिका’ अभिनव उपक्रम गटशिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे यांच्या हस्ते सुरु* – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

*मिणचे खुर्द शिक्षण मंचच्या वतीने ‘संध्या अभ्यासिका’ अभिनव उपक्रम गटशिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे यांच्या हस्ते सुरु*

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

*मिणचे खुर्द शिक्षण मंचच्या वतीने ‘संध्या अभ्यासिका’ अभिनव उपक्रम गटशिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे यांच्या हस्ते सुरु*

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
शैक्षणिक व पुरोगामी विचारांचा वसा आणि वारसा असणाऱ्या मिणचे खुर्द ( ता. भुदरगड) या गावात नव्याने स्थापन झालेल्या ‘मिणचे खुर्द शिक्षण मंच’ च्या वतीने गावातील विद्यार्थ्यांच्यासाठी संध्या अभ्यासिका सुरू केली आहे. या अभिनव अभ्यासिकेचे उद्घाटन भुदरगडचे गटशिक्षणाधिकारी मा. दीपक मेंगाणे यांच्या हस्ते करण्यात आले.
मोबाईल व दूरदर्शन यांची वाढती व्यसनाधीनता ही एक काळाची समस्या बनली आहे यावर उपाययोजना म्हणून शैक्षणिक व सामाजिक कार्य करणाऱ्या या नुतन मंचच्या वतीने गावातील विद्यार्थ्यांच्यासाठी संध्या अभ्यासिका सुरू केली आहे. या शिक्षण मंचातील प्रमुख सदस्य व सेवानिवृत्त मुख्याध्यापक सर्जेराव देसाई हे पर्यवेक्षक म्हणून भूमिका बजावणार आहेत तसेच मंचातील इतर शिक्षक सदस्य सुद्धा यासाठी सहकार्य करणार आहेत. रोज सायंकाळी सहा ते आठ या वेळेत मुलांसाठी ही अभ्यासिका सुरू राहणार आहे. सदर अभ्यासिका ही मुलांसाठी ऐच्छिक आहे. या काळात अभ्यासासाठी योग्य वातावरण उपलब्ध करून देणे, आवश्यक तेथे मार्गदर्शन करणे, आवश्यक सोई सुविधा व गरजांची पूर्तता करणे आदी गोष्टी शिक्षणमंचच्या वतीने पुरवल्या जाणार आहेत.
या अभिनव अभ्यासिकेच्या उद्घाटनप्रसंगी राधानगरीचे गटशिक्षणाधिकारी बी.एम.कासार, माजी जि. प. सदस्य आर.व्ही. देसाई, माजी सभापती आक्काताई नलवडे, शिक्षण मंचचे अध्यक्ष प्राचार्य डी. एस. देसाई, सरपंच जयश्री खेगडे, उपसरपंच मनीषा नलवडे, मुख्याध्यापक एस.डी. देसाई, मुख्याध्यापक हिंदुराव खाडे, पत्रकार डी.वाय. देसाई, गावातील प्रतिष्ठित नागरिक, शिक्षण प्रेमी, गावातील शिक्षक व विद्यार्थी आदी. उपस्थित होते यावेळी सचिव सचिन देसाई यांनी आपल्या उपक्रमातून प्राप्त झालेल्या शैक्षणिक साहित्याचे वाटप मुलांना केले. शेवटी आभार श्री.महावीर पाटील यांनी मानले. या शिक्षण मंचामध्ये गावातील सर्व शिक्षक वृंद तसेच उच्चशिक्षित युवक आणि शिक्षणप्रेमी नागरिक सहभागी आहेत. पुढील काळात देखील या मंचच्या वतीने सर्वांना सहभागी करून गावात शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबवण्याचा निर्धार करण्यात आला.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930