नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , *मुख्याध्यापक संघाच्या वतीने शनिवार १४ ऑक्टोबर रोजी दु.२.३० वा. सेवानिवृत्त मुख्याध्यापकांच्या सत्कार समारंभाचे आयोजन* – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

*मुख्याध्यापक संघाच्या वतीने शनिवार १४ ऑक्टोबर रोजी दु.२.३० वा. सेवानिवृत्त मुख्याध्यापकांच्या सत्कार समारंभाचे आयोजन*

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

*मुख्याध्यापक संघाच्या वतीने शनिवार १४ ऑक्टोबर रोजी दु.२.३० वा. सेवानिवृत्त मुख्याध्यापकांच्या सत्कार समारंभाचे आयोजन*

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कोल्हापूर
कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यातील माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांच्या सेवानिवृत्त मुख्याध्यापकांचा सत्कार समारंभ शिक्षक आमदार श्री. जयंतराव आसगावकर यांच्या हस्ते व मुख्याध्यापक संघाचे माजी चेअरमन श्री.बी.जी. काटे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार दि. १४ ऑक्टोबर रोजी दु.२.३० वा. विद्याभवन, कोल्हापूर येथे आयोजित केल्याची माहिती संघाचे चेअरमन श्री.सुरेश संकपाळ यांनी दिली.
यावेळी शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष श्री.एस. डी. लाड, शिक्षक भारतीचे अध्यक्ष दादासाहेब लाड, डी. बी. पाटील विचारमंचचे अध्यक्ष व्ही.जी.पोवार, मुख्याध्यापक संघाचे माजी चेअरमन के.बी.पोवार, शिक्षकेत्तर संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाबा पाटील, कायम विनाअनुदान शाळा कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे, मुख्याध्यापक संघाचे माजी व्हा.चेअरमन श्री. एन. बी. पाटील, बाजार समितीचे माजी उपसभापती श्री.विलास साठे, खाजगी प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष श्री.भरत रसाळे, मुख्याध्यापक महामंडळाचे आजीव सदस्य श्री.डी.एस.पाटील, आश्रमशाळा कृती समितीचे राज्याध्यक्ष श्री.शिवाजी कोरवी, माजी व्हा.चेअरमन श्री. प्रतापराव देशमुख,
माजी संचालक श्री. के.के.पाटील, शिक्षक परिषदेचे शहराध्यक्ष श्री. उदय पाटील, शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष श्री. विष्णू पाटील यांच्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री. अर्जुन होणगेकर (करवीर), श्री. एस. आर. पाटील (पन्हाळा), श्री. एस. के. पाटील (राधानगरी), श्री. सुरेश पाटील (भुदरगड), श्री.राजेंद्र आर. खोराटे (गडहिंग्लज), श्री. सुभाष सावंत (आजरा), श्री.ए.आर.खामकर (कागल), श्रीमती आर. आर. निर्मळे (शिरोळ), श्री. पी. डी. शिंदे (हातकणंगले), श्री. दिपक एस. लाड (शाहूवाडी), श्री.आर.पी.चौगले (गगनबावडा), श्री. महादेव आर.भोगुलकर (चंदगड) आदी उपस्थित राहणार आहेत. तरी सन २०२१ – २०२२ व २०२२ – २०२३ या शैक्षणिक वर्षात सेवानिवृत्त झालेल्या मुख्याध्याकांनी उपस्थित रहावे असे आवाहन चेअरमन श्री.सुरेश संकपाळ यांनी केले आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930