नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , *सोलापूर शिक्षण विभागात नवीन शिक्षणाधिकारी नेमणार : शिक्षण आयुक्त मांढरे यांची माहिती* *आमदार जयंत आसगावकर यांच्या प्रयत्नाला यश* – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

*सोलापूर शिक्षण विभागात नवीन शिक्षणाधिकारी नेमणार : शिक्षण आयुक्त मांढरे यांची माहिती* *आमदार जयंत आसगावकर यांच्या प्रयत्नाला यश*

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

*सोलापूर शिक्षण विभागात नवीन शिक्षणाधिकारी नेमणार : शिक्षण आयुक्त मांढरे यांची माहिती*
*आमदार जयंत आसगावकर यांच्या प्रयत्नाला यश*
ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, पुणे
सोलापूर जिल्ह्यातील शिक्षण विभागात पूर्ण वेळ शिक्षणाधिकारी नसल्याने येथे कामासाठी येणाऱ्या शिक्षक बांधवांना मोठा त्रास सहन करावा लागतो. यामुळे या विभागात कायमस्वरूपी शिक्षणाधिकारी नेमावा, अशी मागणी शिक्षक आमदार प्रा.जयंत आसगावकर यांनी शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांच्याकडे पत्राद्वारे केली. आयुक्त श्री.मांढरे यांनी शिक्षक बांधवांची अडचण लक्षात घेऊन या ठिकाणी नवीन शिक्षणाधिकारी नेमणार असल्याचे सांगितले.
आमदार जयंत आसगावकर यांनी सोलापूर जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी व लिपिक हे जागेवरच उपस्थित नसल्याचे चित्र वारंवार पहावयास मिळत आहे. परिणामी या कार्यालयामध्ये विविध शैक्षणिक कामासाठी येणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. याशिवाय वरिष्ठ श्रेणी, निवड श्रेणी, संच मान्यता दुरुस्ती अशा प्रकारचे अनेक प्रस्ताव प्रलंबित आहेत. त्यामुळे कामासाठी येणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. त्यामुळे सदर अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी. अशी मागणी केली. यावर शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी याप्रश्नी संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्याची ग्वाही दिली.
यावेळी शिक्षक नेते श्री. अण्णासाहेब गायकवाड, कास्ट्राईबचे श्री. राजेंद्र कांबळे, जुनी पेन्शन हक्क समितीचे श्रीधर गोंधळी आदी उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031