नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , *वनराई बंधारा श्रमदान उपक्रमांचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून कौतुक* – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

*वनराई बंधारा श्रमदान उपक्रमांचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून कौतुक*

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

*वनराई बंधारा श्रमदान उपक्रमांचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून कौतुक*

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कोल्हापूर
कोल्हापुरातील निगवे ग्रामपंचायत व माध्यमिक आश्रमशाळा व महात्मा जोतीराव फुले कनिष्ठ महाविद्यालय रजपुतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने केलेल्या वनराई बंधारा श्रमदान उपक्रमांचे कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.संतोष पाटील यांनी कौतुक केले.
एकीकडे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणा विषयी प्रेम, आपुलकी निर्माण होण्यासाठी निगवे ग्रामपंचायतीच्या वतीने माझी वसुंधरा अभियान अंतर्गत गावातील ओढ्यावर वनराई बंधारा श्रमदानातून बांधण्यात आला. यामुळे पाणीटंचाईवर मात करून ओढ्यालगत असलेल्या शेती, विहीरी यांची पाणी पातळी वाढविण्यासाठी वनराई बंधारा एक स्तुत्य उपक्रम गावकरी व विद्यार्थ्यांनी राबवून सर्वांसमोर नवा आदर्श निर्माण केला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.संतोष पाटील यांनी नुकतीच या वनराई बंधार्यास भेट देऊन या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती घेऊन ग्रामपंचायत निगवे सरपंच, सदस्य, सुंदर माझी वसुंधरा कार्यकारी सदस्य, आश्रमशाळा मुख्याध्यापक व शिक्षक, विद्यार्थी यांचे अभिनंदन केले
याप्रसंगी उपकार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) श्री.अरूण जाधव, गटविकास अधिकारी श्री.विजय यादव, सरपंच कोमल जासुद, माझी वसुंधरा सदस्य, ग्रामसेवक संजय शिंदे, माध्यमिक आश्रमशाळा व महात्मा जोतीराव फुले कनिष्ठ महाविद्यालय, रजपुतवाडीचे प्राचार्य शिवाजी कोरवी, संस्था कार्यवाह प्रा.सुनिल भोसले, कृष्णात पाटील,
प्रदीप उबाळे, आनंदा वाघमोडे, प्रशांत भोसले, निशिगंधा नलवडे, सारीका आडके, सुजाता सुरवसे विद्यार्थी, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031