नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , स्पर्धा परीक्षेत अपयश आल्यास आयुष्य थांबत नाही पण त्यासाठी ‘प्लॅन बी’ तयार असायला हवा : डॉ.अमोल पाटील – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

स्पर्धा परीक्षेत अपयश आल्यास आयुष्य थांबत नाही पण त्यासाठी ‘प्लॅन बी’ तयार असायला हवा : डॉ.अमोल पाटील

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

स्पर्धा परीक्षेत अपयश आल्यास आयुष्य थांबत नाही पण त्यासाठी ‘प्लॅन बी’ तयार असायला हवा : डॉ.अमोल पाटील

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी होणे हे अनेकांच्या आयुष्याचे ध्येय असते. लाखो विद्यार्थी अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहतात मात्र प्रत्येकालाच यश मिळेल असे नाही पण अपयश पदरात पडल्यावर आयुष्य थांबतेच असे नाही. त्याकरीता प्लॅन बी देखील तयार ठेवा जेणेकरुन कोणत्याही क्षेत्रात गेल्यास पुढे पाऊल ठेवता येईल, असे प्रतिपादन अभिनव करीयर अकॅडमीचे संचालक डॉ.अमोल पाटील यांनी केले.
श्री.आनंदराव आबीटकर इंग्लीश मिडीयम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, गारगोटी येथे आयोजित CET, JEE व NEET स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेत डॉ. पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्या सौ.रोहिणीताई आबिटकर होत्या.
यावेळी बोलताना जि.प.सदस्या सौ.रोहिणीताई आबिटकर म्हणाल्या, स्पर्धा परीक्षेची तयारी योग्य नियोजनासह करावी व ध्येय गाठावे. मिळालेले यश स्वतःसाठी तसेच समाज व देश घडविण्याच्या दृष्टीने महत्वाचे ठरेल.
यावेळी संस्था प्रतिनिधी अवधुत परुळेकर, प्राचार्य टी.बी.माने, प्रा.अमिता जाधव तसेच श्री.आनंदराव आबीटकर इंग्लीश मिडीयम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे शिक्षक –शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, पालक मोठया संख्येने उपस्थित होते. प्रारंभी प्रास्ताविक व सुत्रसंचालन सौ.निता आदीत्य यांनी व आभार सौ.शुभांगी कांबळे यांनी मानले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930