नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ : जळगाव अधिवेशनाच्या अध्यक्षपदी श्री.विजय पाटील यांची निवड – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ : जळगाव अधिवेशनाच्या अध्यक्षपदी श्री.विजय पाटील यांची निवड

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ : जळगाव अधिवेशनाच्या अध्यक्षपदी श्री.विजय पाटील यांची निवड

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, रत्नागिरी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळाच्या जळगाव येथे पार पडणाऱ्या ६२ व्या राज्यस्तरीय अधिवेशनाच्या अध्यक्षपदी रत्नागिरी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री.विजय पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली.
पुणे येथे महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाच्या झालेल्या बैठकीत अधिवेशनाच्या अध्यक्षपदी श्री.विजय पाटील यांची निवड करण्यात आली.
अध्यक्षपदासाठी विजय पाटील (रत्नागिरी), तानाजी माने (सोलापूर), प्रसाद गायकवाड (पुणे), सचिन नलवडे (सातारा), सुरेश संकपाळ (कोल्हापूर), विजय सुर्यवंशी (नंदुरबार) यांची उमेदवारी होती. सर्वसंमतीने विजय पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर मुख्याध्यापक महामंडळाचे उपाध्यक्ष, कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
अधिवेशनाच्या अध्यक्षपदाच्या निवडीची प्रक्रिया आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे,महामंडळाचे माजी अध्यक्ष अरुण थोरात, सचिव शांताराम पोखरकर, आदिनाथ थोरात, शिवाजी किलकीले यांनी पार पाडली.
श्री.विजय पाटील यांचे मुळ गाव व्हनाळी ता.आजरा जि. कोल्हापूर असून सध्या माध्यमिक विद्यामंदिर, ताम्हाणे ता. राजापूर जि. रत्नागिरी या शाळेचे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शाळा सेवक पतपेढीचे तज्ञ संचालक, छ. संभाजीराजे ग्रामीण बिगरशेती सह पतसंस्था, पाचलचे मुख्यप्रवर्तक, ताम्हाणे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य, राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत. त्यांना तालुका, जिल्हा व राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त आहेत.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031