राज्यस्तरीय रोलर स्केटिंग स्पर्धेसाठी ज्ञानप्रबोधिनी स्केटिंग क्लबच्या खेळाडूंची निवड
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
राज्यस्तरीय रोलर स्केटिंग स्पर्धेसाठी ज्ञानप्रबोधिनी स्केटिंग क्लबच्या खेळाडूंची निवड
ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
ज्ञानप्रबोधिनी स्केटिंग क्लब, गारगोटीच्या कु. श्रावणी विठ्ठल पाटील कु. तनिष्का अमित हवलदार तसेच कु.अन्वी संदीप यादव यांनी स्पीड स्केटिंग प्रकारामध्ये बाजी मारली असून त्यांची ७ ते १० नोव्हेंबर २०२३ रोजी विरार, मुंबई येथे होणाऱ्या ३३ व्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्हा संघातून निवड झाली आहे.
ॲमेच्युअर कोल्हापूर जिल्हा रोलर स्केटिंग ही संघटना नोंदणीकृत असून स्केटिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र,
रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया, वर्ल्ड स्केट शी संलग्न त्याचबरोबर इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी, एशियन गेम, भारतीय ऑलिम्पिक संघटना, महाराष्ट्र ऑलिम्पिक कमिटी मान्यताप्राप्त संघटना असून यांच्यामार्फत कोल्हापूर जिल्हा संघ निवड चाचणी नुकतीच विभागीय क्रीडा संकुल कोल्हापूर येथे घेण्यात आली.
या स्पर्धा स्केटबोर्डिंग, कलात्मक स्केटिंग, स्पीड स्केटिंग, इनलाइन फ्री स्टाईल, रोलर फ्रीस्टाइल, रोलर हॉकी, इनलाइन हॉकी, इनलाइन डाउनहिल, अल्पाइन, रोलर डर्बी आणि रोलर स्कूटर. कॅडेट, सब ज्युनियर, कनिष्ठ, वरिष्ठ आणि मास्टर्स (पुरुष आणि महिला) वयोगटांसाठी राज्यस्तरावर आयोजित केल्या आहेत.
कोल्हापूर जिल्हा निवड चाचणी राज्य संघटनेचे उपाध्यक्ष प्रा. महेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आल्या. या सर्व विद्यार्थ्यांना प्रशिक्षक इंद्रजित मराठे यांचे मार्गदर्शन लाभले. ज्ञानप्रबोधिनी स्केटिंग क्लबचे अध्यक्ष मिलिंद पांगिरेकर यांचे प्रोत्साहन तर, पालक श्री. विठ्ठल पाटील, सौ. हर्षला हवलदार, श्री. आमित हवलदार व श्री. संदीप यादव यांची प्रेरणा मिळाली आहे.
रोलर स्केटिंग हा ऑल इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स, स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडिया, सी बी सी बोर्ड, केंद्रीय विद्यालय आणि आयसीएसई बोर्ड नॅशनल गेम्स चा एक भाग आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
