नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , चित्रकार प्रशांत जाधव यांना शिक्षणतज्ज्ञ डॉ.जे.पी.नाईक पुरस्कार : शैक्षणिक व कला क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा गौरव – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

चित्रकार प्रशांत जाधव यांना शिक्षणतज्ज्ञ डॉ.जे.पी.नाईक पुरस्कार : शैक्षणिक व कला क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा गौरव

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

चित्रकार प्रशांत जाधव यांना शिक्षणतज्ज्ञ डॉ.जे.पी.नाईक पुरस्कार : शैक्षणिक व कला क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा गौरव

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कोल्हापूर
कोल्हापूर आर्ट फाउंडेशनचे समन्वयक चित्रकार प्रशांत जाधव यांना शिक्षणतज्ज्ञ डॉ.जे.पी.नाईक पुरस्कार प्राप्त झाला आहे. वाय.पी.पवार रंगमंच, प्रायव्हेट हायस्कूल येथे आयोजित समारंभात आयसीटीचे माजी कुलगुरू पद्मश्री डॉ.जी.डी.यादव यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
प्रायव्हेट एजुकेशन सोसायटी आणि माजी विद्यार्थी संघाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन अरुण डोंगरे, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष भूपेंद्र शहा व संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
अंगभूत कला कौशल्य, व्यासंग, शिक्षण सेवेची कार्यनिष्ठा, शैक्षणिक तसेच कलाक्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला आहे. प्रशांत जाधव यांना यापूर्वी अनेक संस्थांचे विविध पुरस्कार मिळाले आहेत. राज्यस्तरीय स्पर्धा, कला महोत्सव, प्रात्यक्षिक, कार्यशाळा, नवनवीन कलाविषयक उपक्रम यामध्ये त्यांनी प्रामुख्याने कार्य केले आहे. अनेक मासिके वृत्तपत्रातून कलाविषयक विपुल लेखन केले आहे. त्यांचे कोल्हापूरच्या कला नगरीमध्ये मोलाचे योगदान आहे. अतिशय संयमी शिक्षक, विद्यार्थी प्रिय व प्रशासनामध्ये प्रशंसनीय व्यक्तिमत्व म्हणून प्रसिद्ध आहेत. एक शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य म्हणून त्यांची कारकीर्द अतिशय उल्लेखनीय आहे.
शिक्षणतज्ज्ञ डॉ.जे.पी.नाईक यांचे श्री मौनी विद्यापीठ, गारगोटी व प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटी, कोल्हापूर या शैक्षणिक संस्थेसाठी मोलाचे योगदान आहे. श्री.मोनी विद्यापीठ, गारगोटी येथे प्रशांत जाधव यांचे शिक्षण पूर्ण झाले. त्यानंतर अध्यापक म्हणून प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटीमध्ये सध्या कार्यरत आहेत. या शैक्षणिक संस्थांचे प्रणेते असणारे शिक्षणतज्ज्ञ डॉ.जे.पी.नाईक यांच्या नावाचा पुरस्कार ही एका प्रेरणादायी अभिमानास्पद गोष्ट आहे. या पुरस्काराबद्दल प्रशांत जाधव यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930