नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , पर्यावरण साक्षर बनवण्याच्या उद्देशातून विद्यार्थ्यांना मिळणार निसर्गशिक्षण : ठाणे महापालिका व बीएनएचएस यांच्यात करार – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

पर्यावरण साक्षर बनवण्याच्या उद्देशातून विद्यार्थ्यांना मिळणार निसर्गशिक्षण : ठाणे महापालिका व बीएनएचएस यांच्यात करार

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

पर्यावरण साक्षर बनवण्याच्या उद्देशातून विद्यार्थ्यांना मिळणार निसर्गशिक्षण : ठाणे महापालिका व बीएनएचएस यांच्यात करार

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, ठाणे
ठाणे महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना निसर्ग शिक्षण देण्याचा निर्णय आयुक्त अभिजित बांगर यानी घेतला असून बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या (बीएनएचएस) सहकार्याने हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. शाळामध्ये निसर्ग संकल्पनेवर आधारित सत्रे आणि अभ्यास दौरे होणार
आहेत. विद्यार्थ्यांना पर्यावरण साक्षर बनवण्याच्या उद्देशातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. बीएनएचएस ही भारतीय उपखंडातील १४० वर्षे जुनी सर्वात मोठी पर्यावरण संशोधन संस्था आहे.
ठाणे महापालिकेच्या शाळांमधील इ.५ वी ते इ.१० वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या सुमारे ७ हजार विद्यार्थ्यांना निसर्ग शिक्षण देण्यात येईल. ठाणे महापालिकेचा शिक्षण विभाग आणि बीएनएचएसमध्ये या उपक्रमासाठी करार झाला असून त्याची अंमलबजावणीही सुरु झाली आहे. पालिकेच्या शाळातील विद्यार्थ्याना पर्यावरण शिक्षण देणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. या उपक्रमात बीएनएचएसचे शिक्षण अधिकारी आणि समन्वयक ‘पर्यावरण जागरु कता’ या विषयावर संवादात्मक आणि संकल्पनावर आधारित सादरीकरण करतील. पक्षी, फुलपाखरे, वनस्पती, आपल्या सभोवतालची जैवविविधता, फ्लास्टिकमुळे होणारे प्रदूषण, स्वच्छ भारत अभियान, पर्यावरणपूरक जीवनशैलीबद्दलचे कार्यक्रम शाळांमध्ये पुढील वर्षभर आयोजित केले जाणार आहेत.
पालिका शाळेतील विद्यार्थ्यांसाठी संवर्धन शिक्षण केंद्र, ठाणे खाडी अशा वेगवेगळ्या ठिकाणी अभ्यास दौरे आयोजित केले जातील. खारफुटी वनस्पती, पक्ष्यांबद्दलच्या नोंदी करण्यास मार्गदर्शन केले जाईल. या उपक्रमामुळे विदयार्थ्यांना निसर्ग शिक्षण मिळेल, त्यातून पर्यावरण विषयक जागरुकता वाढेल असा विश्वास पालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031