नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेतील ३२,६६७ शिष्यवृत्तीधारकांना १९ कोटी ३९ लाखाचे वितरण : शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांची माहिती – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेतील ३२,६६७ शिष्यवृत्तीधारकांना १९ कोटी ३९ लाखाचे वितरण : शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांची माहिती

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेतील
३२,६६७ शिष्यवृत्तीधारकांना १९ कोटी ३९ लाखाचे वितरण : शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांची माहिती
शिष्यवृत्ती दरातील वाढीमुळे विद्यार्थ्यात समाधान

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, पुणे
शालेय शिक्षण विभागाच्या इ.५ वी व इ.८ वी शिष्यवृत्ती परीक्षेतील ३२ हजार ६६७ शिष्यवृत्तीधारकांना योजना संचालनालयामार्फत १९ कोटी रुपयांचे वितरण करण्यात आल्याची माहिती शिक्षण संचालक (योजना) डॉ. महेश पालकर यांनी दिली आहे. महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदमार्फत घेण्यात येणाऱ्या या शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जातो.
महाराष्ट्रात सन १९५४-५५ पासून सदर योजना कार्यान्वित आहे. शिष्यवृत्ती परीक्षा इ.५ वी व इ.८ वीसाठी घेतली जाते. सदरची शिष्यवृत्ती गुणवान विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रोत्साहनात्मक देण्यात येते. इ.५ वीसाठी एकूण संच संख्या १६ हजार ६८३ तर इ.८ वीसाठी १६ हजार २५८ संच संख्या आहे.
सन २०२३ २४ मध्ये विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वितरणासाठी ४९ कोटी ९४ लाख ५० हजार रुपये आवश्यक आहेत. त्यापैकी नुकताच शासनस्तरावरून १९ कोटी ३९ लाख १९ हजार रुपये निधी प्राप्त झाला आहे. हा निधी सध्या इ.७ वी, इ.८ वी, इ.१० वीमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना देण्यात आला आहे.
प्रतीवर्षी इ.५ वीच्या परीक्षेतून शिष्यवृत्तीधारक ठरलेल्या आणि पुढे इ.६ वी ते इ.८ वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या एकूण ५० हजार ४९ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते. तर इ.८ वीच्या परीक्षेतून शिष्यवृत्तीधारक ठरलेल्या आणि इ.९ वी व इ.१० वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या ३२ हजार ५१६ विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती देण्यात येते.
सन २०२२-२३ पर्यंत विद्यार्थ्यांना संचनिहाय जुन्या दराने शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात येत होते. चालू वर्षापासून सन २०२३ पासून इ.५ वीला रु.५००० तर इ.८ वीला रु.७५०० अशी शिष्यवृत्तीच्या दरामध्ये सुधारणा करण्यात आली आहे. त्याप्रमाणे विद्यार्थ्यांना सन २०२३-२४ पासून वाढीव दराने शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात येत आहे. सध्या संबंधित शिष्यवृत्तीसाठी ४० कोटी ४० लाख रुपये मंजूर आहे.
चालू शैक्षणिक वर्षाकरिता (२०२३ २४) शिष्यवृत्ती परीक्षा १८ फेब्रुवारी रोजी राज्यात होणार आहे. त्यासाठी परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असून ९ नोव्हेंबरपर्यंत राज्यातील ३४ हजार ४३२ शाळांमधील इ.५ वीच्या ३ लाख ७७ हजार ८०६ आणि इ.८ वीच्या २ लाख ८२ हजार ४५७ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज भरले आहेत. नियमित शुल्कासह ऑनलाइन अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस ३० नोव्हेंबर तर विलंब शुल्कासह १५ डिसेंबर आहे.
……………………..

नवीन दराने शिष्यवृत्ती वितरित करण्यासाठी आवश्यक निधीची राज्य शासनाकडे मागणी केलेली आहे. निधी प्राप्त होताच उर्वरित सर्व विद्यार्थ्यांनाही शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात येईल.
– डॉ. महेश पालकर, शिक्षण संचालक (योजना) पुणे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930