नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , पुणे येथे रविवार १९ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या अखिल भारतीय महिला गझल संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी डॉ. स्नेहल कुलकर्णी – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

पुणे येथे रविवार १९ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या अखिल भारतीय महिला गझल संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी डॉ. स्नेहल कुलकर्णी

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

पुणे येथे रविवार १९ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या अखिल भारतीय महिला गझल संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी डॉ. स्नेहल कुलकर्णी

गारगोटी प्रतिनिधी
महाराष्ट्रातील अग्रगण्य संस्था गझल मंथन साहित्य संस्थेच्या वतीने सावरकर अध्यासन केंद्र डेक्कन, पुणे येथे रविवार दि.१९ नोव्हेंबर २०२३ रोजी होणाऱ्या अखिल भारतीय महिला गझल संमेलनाच्या स्वागताध्यक्षा म्हणून म्हणून डॉ. स्नेहल विनय कुलकर्णी ( गारगोटी) यांची निवड करण्यात आली आहे.
गझल क्षेत्रात प्रथमच महिला गझलकारांचे अखिल भारतीय महिला गझल संमेलन आयोजित केले असून या गझल संमेलनाला महाराष्ट्रासह देशभरातून महिला गझलकार उपस्थित राहणार आहेत.
या संमेलनाला अध्यक्षा म्हणून जेष्ठ गझलकारा शोभा तेलंग तर स्वागताध्यक्षा म्हणून डॉ. स्नेहल विनय कुलकर्णी ( गारगोटी) उपस्थित राहणार आहेत. संमेलनाचे उद्घाटन जेष्ठ गझलकारा संगीता जोशी यांच्या हस्ते होणार आहे. तर प्रमुख अतिथी म्हणून आ. उर्मिला बांदिवडेकर, डॉ. संदीप गुप्ते, किरण केंद्रे, प्रमोद खराडे आणि संस्थेचे सचिव जयवंत वानखेडे उपस्थित राहणार आहेत.
यावेळी ‘गझलअमृत’ या दिवाळी अंकाचे तसेच ‘गझलयात्री’ या महिला विशेष गझलसंग्रहाचे प्रकाशन होणार आहे. नामवंत महिला गझलकारांचे मुशायरे यावेळी आयोजित करण्यात आले आहेत.
गझल रसिकांनी या संमेलनाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन गझल मंथन साहित्य संस्थेचे अध्यक्ष आ. अनिल कांबळे, उपाध्यक्ष देवकुमार गुमटकर, सचिव जयवंत वानखेडे, सहसचिव उमा पाटील, प्रसिद्धीविभाग प्रमुख भरत माळी व पुणे जिल्हा कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728