नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , लेकीच्या पुण्यस्मरण दिनानिमित्य म्हसवेच्या अजित यादव कुटुंबियांनी जीवरक्षकांचा केला सन्मान – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

लेकीच्या पुण्यस्मरण दिनानिमित्य म्हसवेच्या अजित यादव कुटुंबियांनी जीवरक्षकांचा केला सन्मान

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

लेकीच्या पुण्यस्मरण दिनानिमित्य म्हसवेच्या अजित यादव कुटुंबियांनी जीवरक्षकांचा केला सन्मान

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
दिवाळीच्या सुट्टीत मामाच्या गावाला गेलेल्या  म्हसवे  (ता.भुदरगड) येथील गावचे सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार अजित यादव यांची कन्या स्व.राजनंदिनीचा अपघाती मृत्यू निधन झाले तर पत्नीही अपघातात जखमी झाली होती. पण आपल्या कुटुंबावर आलेल्या संकटाना मुलीच्या स्व. राजनंदिनीच्या आठवणी मृत्यूपश्यात जागृत राहाव्यात म्हणून म्हसवे येथील यादव कुटुंबीय व राजनंदिनी फाउंडेशन, म्हसवे दरवर्षी विविधांगी सामाजिक बांधिलकी उपक्रमातून उपक्रम राबवून लेकीच्या स्मृती जागृत ठेवत आहेत.
राजनंदिनीच्या पुण्यस्मरणाचे हे चौथे वर्ष आहे. या निमित्य म्हसवे ग्रामपंचायत मध्ये गेली २९ वर्ष पाणक्या (पाणीपुरवठा कर्मचारी) गावचा जलदुत जीवरक्षक रामदास पांडुरग देसाई यांचा व त्यांच्या सुविद्य पत्नी या जोडीचा मानाचा आहेर, जीवरक्षक बिल्ला, फुलाचे वृक्ष देवुन सत्कार करण्यात आला.
दरवर्षी विविधांगी उपक्रम राबवून समाजामध्ये वेगळा विचार देण्याचं काम हे कुटुंबीय करीत आहे. पाणी हे जीवन आहे. गावातील प्रत्येक नळाला स्वच्छ पाणी सोडण्याचे काम निस्वार्थपणे  करणाऱ्या पांणक्याचा सन्मान केला. खूप प्रेरणादायी कार्य आहे. पाणीपुरवठा कर्मचारी हा दुर्लक्षित घटक आहे. त्यांचा सन्मान करताना आनंद होत असल्याची प्रतिक्रिया अजित यादव यांनी दिली.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930