नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , रस्ता सुरक्षा नियमांची पायमल्ली होत असल्यामुळे शालेय जीवनापासूनच जागरुकतेसाठी आरएसपी विषय प्रत्येक शाळेत असायला हवा : आमदार जयंत आसगावकर – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

रस्ता सुरक्षा नियमांची पायमल्ली होत असल्यामुळे शालेय जीवनापासूनच जागरुकतेसाठी आरएसपी विषय प्रत्येक शाळेत असायला हवा : आमदार जयंत आसगावकर

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

रस्ता सुरक्षा नियमांची पायमल्ली होत असल्यामुळे शालेय जीवनापासूनच जागरुकतेसाठी आरएसपी विषय प्रत्येक शाळेत असायला हवा : आमदार जयंत आसगावकर

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कोल्हापूर
देशात रस्ता सुरक्षा नियमांची पायमल्ली होत असल्यामुळे शालेय जीवनापासूनच जागरुकतेसाठी आरएसपी विषय प्रत्येक शाळेत असायला हवा. विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी हा विषय खूपच उपयोगी पडणार आहे, असे प्रतिपादन आमदार जयंत आसगावकर यांनी केले.
रस्ता सुरक्षा दल व नागरी संरक्षण ऑर्गनायझेशन यांच्या वतीने आयोजित आरएसपी प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते. छत्रपती शिवाजी विद्यानिकेतन, पेठ वडगाव येथे आजपासून राज्यस्तरीय प्रशिक्षण कार्यक्रमाला सुरुवात झाली.
आमदार जयंत आसगावकर म्हणाले, रस्ता सुरक्षितता प्रशिक्षण शिक्षकांबरोबर आज विद्यार्थ्यांनाही काळाची गरज बनली आहे. मात्र त्याबाबतीत म्हणावी तशी जागृती आपल्या देशात झालेली नाही. असे प्रशिक्षण मुलांना विद्यार्थी दशेत मिळाल्यास रस्ता सुरक्षिततेचे महत्त्व वाढले. आरएसपी हा विषय आज प्रत्येक शाळेत असणे गरजेचे आहे. प्रत्येक घरात समुपदेशक निर्माण व्हावा, अशी अपेक्षा आमदार जयंत आसगावकर यांनी व्यक्त केली. आरएसपी शिक्षकांना भविष्यात ज्या ज्या अडचणी येतील त्या सोडवण्यात येतील. तसेच त्यांचे प्रश्न येत्या हिवाळी अधिवेशनात मांडले जातील, अशी ग्वाही आमदार जयंत आसगावकर यांनी दिली.
यावेळी आरएसपी संघटनेचे अध्यक्ष मुख्याध्यापक आर. वाय. पाटील, छत्रपती शिवाजी विद्यानिकेतनचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र माने, महासमादेशक अनिल कुंभार, कोषाध्यक्ष साळवी, पूर्वा गुरव यांच्यासह १६ जिल्ह्यातून सुमारे ९० महिला व पुरुष प्रशिक्षक सहभागी झाले होते. दहा दिवस हे प्रशिक्षण सुरु असणार आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031