नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , म्हसवे येथील शंकरराव देसाई हायस्कूलच्या १९९४ – ९५ सालातील विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा संपन्न : २८ वर्षानंतर सवंगडी एकत्र आल्याने भावनिक वातावरण – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

म्हसवे येथील शंकरराव देसाई हायस्कूलच्या १९९४ – ९५ सालातील विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा संपन्न : २८ वर्षानंतर सवंगडी एकत्र आल्याने भावनिक वातावरण

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

म्हसवे येथील शंकरराव देसाई हायस्कूलच्या १९९४ – ९५ सालातील विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा संपन्न : २८ वर्षानंतर सवंगडी एकत्र आल्याने भावनिक वातावरण

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
म्हसवे (ता.भुदरगड) येथील शंकरराव देसाई हायस्कूल मधील सन १९९४ – ९५ सालातील इ.१० वी बॅचच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न झाला. या निमित्ताने वर्गातील सर्व मुलींना माहेरची साडी म्हणून एक मैत्रीची साडी व शिदोरी देऊन मुलांनी त्यांना वैयक्तिक घरी जाऊन निमंत्रण दिले होते. हे आगळेवेगळे निमंत्रण पाहून डोळे पाणावल्याच्या भावना अनेक मुलींनी व्यक्त केल्या.
ज्या शाळेतून मिळालेल्या ज्ञानाच्या, शिक्षणाच्या जोरावर आपापल्या क्षेत्रात विविध पदांवर कार्यरत असणारे म्हसवे येथील शंकरराव देसाई हायस्कूल या शाळेच्या सन १९९४/९५ या सालातील इ.१० वी बॅचच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा त्यावेळी शिकविणाऱ्या गुरुजनांसमवेत तब्बल २८ वर्षानंतर पार पडला.
डोंगराच्या पायथ्याशी, वेदगंगा नदीच्या किनाऱ्यावर, ग्रामदैवत धोंडीदेवाचे छायेखाली असणाऱ्या या शाळेत सर्व गुरुजनांचे पारंपरिक वाद्यवृंद, फेटे बांधून, धोंडीदेवांचे मनोभावे दर्शन घेऊन स्वागत केले. शाळेच्या प्रांगणात रांगोळी, फुलांची सजावट, ‘यारों जैसा यार कहाँ, ये दोस्ती हम नहीं तोडेंगे’ या मैत्रीपूर्ण गाण्यांच्या तालावर सर्व वातावरण आल्हाददायक झाले होते.
सर्व शिक्षकांचे प्राजक्ताची रोप, शाल पुष्पगुच्छ देवून शब्दफुलांनी स्वागत करण्यात आले. जीवनाला आकार देणाऱ्या, संस्कारित करणाऱ्या शाळा व शिक्षकांबद्दल अनेकांनी कृतज्ञता व्यक्त करणारी भाषणे केली. शालेय जीवनातील गंमती जमती, शाळेला मारलेल्या दांड्या, त्याबद्दल मिळालेला शिक्षेचा प्रसाद या व अशा अनेक आठवणींना उजाळा मिळाला.
श्री. नामदेव देसाई (खातेदार) यांच्या भजनाने वातावरण मंत्रमुग्ध झाले. यावेळी बोलताना शिक्षक श्री.अनंत डोंगरकर म्हणाले, म्हसवे गाव व शाळा यावर माझी श्रद्धा व निष्ठा असून तुम्ही चांगले शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी वेळप्रसंगी आम्ही शिक्षकांनी शिक्षा केली. आज तुमचे यश पाहून जन्माचे सार्थक झाल्यासारखे वाटते. तसेच तत्कालीन शिक्षक श्री.मोरे, श्री.परीट, श्री.एन.बी.कांबळे यांनीही मनोगत व्यक्त करून सर्वांना शुभेच्छा दिल्या.
स्नेहमेळाव्याचे संयोजन करणाऱ्या अंबादास देसाई, सतिश जाधव, प्रा.सुषमा पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
प्रारंभी स्वागत अंबादास देसाई, प्रास्ताविक सुषमा पाटील, आभार अमोल डोंगरकर यांनी मानले. या स्नेहमेळाव्यासाठी व्ही.डी.पाटील,मोरे मॅडम, शिक्षकेतर कर्मचारी महादेव भोसले,आनंदा देसाई, शिवाजी देसाई तसेच शुभांगी लाड (शाहूवाडी), अश्विनी मोरे (नवे पारगाव), शुभांगी यादव (वळीवडे), सुमन खोत (बेलेवाडी काळम्मा), उज्ज्वला खोत (गडहिंग्लज), सविता पाटील, मनिषा पाटील (कणेरी), गीता यादव (म्हाळुंगे), जयश्री देसाई (कोळवण), सुषमा पाटील, अमोल डोंगरकर, प्रशांत मोरे, सुरेश माणगांवकर (कोल्हापूर), संतोष नलवडे, तानाजी सांडूगडे (मुंबई), सचिन देसाई (खिंडी व्हरवडे), सुभाष आकनूरकर (पेठवडगाव) याचबरोबर म्हसवे, दारवाड, मोरेवाडी, भाटीवडे या गावातील विद्यार्थी या स्नेहमेळाव्यास उपस्थित होते. यावेळी मित्रमंडळी फोटो सेशनपेक्षा एकमेकांना भावनिक व मानसिक आधार देत एकमेकांच्या सुखदुःखात सामील झाले होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031