नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , ग्वाल्हेर येथील राष्ट्रीय रंगोत्सवात कोल्हापूरच्या १६ चित्रकारांनी उमटविला ठसा : बैजातालमध्ये चित्रकारांनी आपल्या सिद्धहस्त कुंचल्यातून रेखाटले निसर्ग सौंदर्य – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

ग्वाल्हेर येथील राष्ट्रीय रंगोत्सवात कोल्हापूरच्या १६ चित्रकारांनी उमटविला ठसा : बैजातालमध्ये चित्रकारांनी आपल्या सिद्धहस्त कुंचल्यातून रेखाटले निसर्ग सौंदर्य

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

ग्वाल्हेर येथील राष्ट्रीय रंगोत्सवात कोल्हापूरच्या १६ चित्रकारांनी उमटविला ठसा : बैजातालमध्ये चित्रकारांनी आपल्या सिद्धहस्त कुंचल्यातून रेखाटले निसर्ग सौंदर्य

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कोल्हापूर
ग्वाल्हेर (मध्यप्रदेश) येथे झालेल्या राष्ट्रीय रंगोत्सवात कलानगरी म्हणून ओळख असणाऱ्या कोल्हापूरच्या १६ अभिजात चित्रकारांनी चित्रकलेतील कोल्हापूर स्कुलचा अनुभव दिला. प्रा.वासंती जोशी कला सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे राष्ट्रीय रंगोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
कोल्हापूरच्या कलाकारांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने तसेच त्यांच्या हस्ते प्रा.वासंती जोशी आर्ट गॅलरीच्या उद्घाटनाच्या निमित्ताने कोल्हापूरातील नामांकित चित्रकारांना ग्वाल्हेर येथे चित्र प्रात्यक्षिक आणि आर्ट गॅलरी उद्घाटनासाठी निमंत्रित केले होते. या राष्ट्रीय रंगोत्सवांत कोल्हापूरच्या वास्तववादी शैलीतील विशेष आकर्षण असणारे प्रत्यक्ष नैसर्गिक चित्र प्रात्यक्षिकाचे आयोजन बैजाताल या ठिकाणी केले होते. विशेष म्हणजे बैजाताल हे उत्तर मराठा साम्राज्याचे एक ऐतिहासिक ठिकाण आहे. तरंगता रंगमंच म्हणूनही हे ठिकाण प्रसिद्ध आहे. या ठिकाणी कोल्हापुरातील चित्रकारानी प्रत्यक्ष जाऊन तेथील निसर्ग सौंदर्य आपल्या सिद्धहस्त कुंचल्यातून रेखाटले.
यामध्ये चित्रकार राजेंद्र हंकारे, शिवाजी मस्के, प्रशांत जाधव, विजय टिपुगडे, नागेश हंकारे, सूर्यकांत निंबाळकर, अरुण सुतार, संपत नायकवडी, अभिजीत कांबळे, मनोज सुतार, बबन माने, श्रीरंग मोरे सुनील पंडित, रमण लोहार, अनिल अहिरे विजय उपाध्ये आदी कलाकारांचा सहभाग होता.
ग्वाल्हेर येथील गोड गुलाबी थंडीत धुक्याच्या धुमारामध्ये या कलाकारांनी आपली निसर्गचित्रे ठिकाणी रेखाटली. या सरोवरात ज्याला तरंगता रंगमंच असे संबोधले जाते या ठिकाणी चित्रकार राजेंद्र हंकारे यांनी २५ फूट कागदावर या राष्ट्रीय रंगोत्सवाच्या शुभेच्छा कॅलिग्राफी पद्धतीने रेखाटल्या.
यावेळी ग्वाल्हेरचे जिल्हाधिकारी अक्षयकुमार सिंग यांनी प्रत्यक्ष भेट देऊन कोल्हापुरच्या कलाकारांचे विशेष कौतुक केले. याप्रसंगी कोल्हापूर आर्ट फाउंडेशनचे समन्वयक प्रशांत जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या कोल्हापूरच्या कलावंतांच्या कला शैलीची विशेष माहिती दिली. प्रत्येक वर्षी अशा पद्धतीचा उपक्रम घेण्याचे अभिवचन जिल्हाधिकारी अक्षयकुमार सिंग यांनी दिले.
याप्रसंगी ग्वाल्हेर येथील स्थानिक चित्रकार आणि कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी कोल्हापूरच्या कलावंतांची कार्यशैली अनुभव घेतला. सर्व निसर्गचित्राचे प्रदर्शन ग्वाल्हेर येथील या हॉटेलमध्ये सर्वांसाठी प्रदर्शित केले होते. विशेष म्हणजे या प्रदर्शनातील रसिकांनी निसर्गचित्रांची खरेदीही केली.
जे.जे.स्कूल ऑफ आर्ट, मुंबईचे प्रा.डॉ गणेश तरतरे, आग्रा फाईन आर्ट कॉलेजचे प्राचार्य प्रा.डॉ.सरोज भार्गव, प्रा. बळवंतसिंह भादोरीया, पुनीत जोशी, मैत्रेयी शुक्ल यांच्यासह कला रसिक, पर्यटक उपस्थित होते. या ग्वाल्हेर मधील राष्ट्रीय रंगोत्सव यशस्वी करण्यासाठी कोल्हापूरचे प्राचार्य अजय दळवी, कोल्हापूर आर्ट फौंडेशनचे समन्वयक चित्रकार प्रशांत जाधव आणि धीरज सुतार विशेष परिश्रम घेतले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930