राज्यातील शैक्षणिक समस्या सोडवण्यासाठी नागपूर येथे शिक्षणमंत्री नाम.दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न : शिक्षक आमदारांसह अधिकारी उपस्थित
|
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
राज्यातील शैक्षणिक समस्या सोडवण्यासाठी नागपूर येथे शिक्षणमंत्री नाम.दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न : शिक्षक आमदारांसह अधिकारी उपस्थित

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, नागपूर
महाराष्ट्र राज्यातील शैक्षणिक समस्या सोडवण्यासाठी आज हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नागपूर येथील विधानभवनात शिक्षणमंत्री नामदार दीपकभाई केसरकर यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली. यावेळी शिक्षक आमदार, शिक्षण विभागातील अधिकारी उपस्थित होते.
यावेळी झालेल्या चर्चेत शेवटच्या वर्गाची पटसंख्या सरासरी धरणे किंवा २०२३ – २४ ची पटसंख्या पकडणे, आयुक्त स्तरावरील अघोषित शाळांचे सर्व प्रस्ताव मंजूर करून अनुदान देणे, ज्या शाळेतील शिक्षक शिक्षकेतरांचे जावक नंबर जुळत नाही किंवा नोंदी नाहीत त्यांच्या बाबतीत सहानभूतीने विचार करून ११ मुद्दे तपासून अनुदान देण्याचे ठरले, २० टक्के अनुदान मंजूर झालेल्या शाळेतील शिक्षकेतरांचे ११ पैकी सहा मुद्दे उपलब्ध नसतील तर दोन मुद्दे ग्राह्य धरून अनुदान द्यावे, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती कोर्टाची स्थगिती असल्यामुळे करता येत नाही, परंतु एकही कर्मचारी जिथे नाही अशा ठिकाणी भरती करण्यासाठी मंजुरी द्यावी, पुढील टप्पा वाढ १ जानेवारीपासूनच देणे, दरवर्षी ३० नोव्हेंबरची पटसंख्या बघून टप्पा वाढ थांबवू नये, उच्च माध्यमिक विद्यालयातील आयटी शिक्षकांना अनुदान मिळावे आदी विषयावर चर्चा झाली. याबाबत शिक्षणमंत्र्यांनी सकारात्मकता दाखविली.
या बैठकीस कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार निरंजन डावखरे, आमदार मनीषा कायंदे, आमदार विक्रम काळे, आमदार किशोर दराडे, आमदार जयंत आसगावकर, आमदार सुधाकर आडबले, आमदार किरण सरनाईक, आमदार सत्यजित तांबे, आमदार राठोड, माजी आमदार श्रीकांत, प्रधन सचिव रणजित सिंह देओल, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, सह सचिव श्री.समीर सावंत, श्री.करपते, उप सचिव तुषार महाजन, श्री.काझी आदी उपस्थित होते.
—
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
आणखी कथा





