नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , आजीच्या आठवणीसाठी विद्यामंदिर बसरेवाडी शाळेस ढेरे कुटुंबीयांकडून संगणक भेट : विद्यार्थ्यांना संगणक शिक्षणाशी सोय – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

आजीच्या आठवणीसाठी विद्यामंदिर बसरेवाडी शाळेस ढेरे कुटुंबीयांकडून संगणक भेट : विद्यार्थ्यांना संगणक शिक्षणाशी सोय

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

आजीच्या आठवणीसाठी विद्यामंदिर बसरेवाडी शाळेस ढेरे कुटुंबीयांकडून संगणक भेट : विद्यार्थ्यांना संगणक शिक्षणाशी सोय

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, बसरेवाडी
बसरेवाडी (ता.भुदरगड) येथील ढेरे कुटुंबीयांनी आपली आज्जी सोनाबाई दत्तू ढेरे यांच्या उत्तरकार्यादिवशी विद्यामंदिर शाळेस संगणक दिला. शाळेत संगणक नसल्याने विद्यार्थ्यांची कुचंबणा होत होती ही अडचण लक्षात घेऊन ढेरे कुटुंबीयांनी संगणक भेट देऊन आदर्श निर्माण केला आहे.
सोनाबाई ढेरे यांचे १०० व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या उत्तर कार्यानिमित्त होणारा अनावश्यक खर्च टाळून त्यांचे नातू राकेश, रोहन, रोहित, राजेश व संदीप ढेरे या नातवानी विद्यामंदिर बसरेवाडी शाळेस संगणक भेट देऊन आपल्या आजीच्या स्मृती चिरंतन ठेवण्याचा प्रयत्न केला. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका शर्वरी राणे यांनी लोक सहभागातून अशा रीतीने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांना मदत केल्यास जिल्हा परिषद शाळा लवकरच नावारुपास येतील व गोरगरिबांची मुले करियर करतील असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष सर्व सदस्य, मुख्याध्यापिका शर्वरी राणे, विद्यार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते. दामोदर देवेकर यांनी स्वागत केले. अमोल पाटील यांनी आभार मानले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930