नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , हुतात्म्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याची न्या.रानडे हायस्कूलची परंपरा आदर्शवत – ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य जीवन साळोखे हुतात्मादिनाचे औचित्य साधून प्रशालेस पाच हजार रुपयाची ग्रंथभेट – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

हुतात्म्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याची न्या.रानडे हायस्कूलची परंपरा आदर्शवत – ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य जीवन साळोखे हुतात्मादिनाचे औचित्य साधून प्रशालेस पाच हजार रुपयाची ग्रंथभेट

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

हुतात्म्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याची न्या.रानडे हायस्कूलची परंपरा आदर्शवत – ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य जीवन साळोखे

हुतात्मादिनाचे औचित्य साधून प्रशालेस पाच हजार रुपयाची ग्रंथभेट

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, सेनापती कापशी
१३ डिसेंबर १९४२ च्या गारगोटी खजिना हल्ल्यात जुलमी ब्रिटिश सत्तेच्या गोळीबारात हुतात्मे झालेल्या सात शहिदांचे स्मरण हे देशप्रेमाचे प्रतिक असून ते नव्या पिढीस नेहमीच स्फूर्तिदायक ठरणारे आहे. हे स्मरण हुतात्म्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करते, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य जीवन साळोखे यांनी केले. ते शिक्षण प्रसारक मंडळ, कोल्हापूरच्या न्या.रानडे हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, सेनापती कापशी येथे हुतात्मा दिनानिमित्त आयोजित सदभावना कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रशालेचे प्राचार्य एस.डी.माने होते. तर प्रमुख उपस्थिती हुतात्मा शंकरराव इंगळे कुटुंबातील श्रीमती शोभा इंगळे, आर बी जगताप, पर्यवेक्षक श्री. यादव हे होते.
यावेळी प्रशालेच्या वतीने ग्रंथप्रदर्शन भरवले होते. त्याचे उद्घाटन प्राचार्य जीवन साळोखे यांनी केले.
प्रारंभी प्रा.व्ही.एस.पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रा.सौ.खोत यांनी १९४२ च्या स्वातंत्र्य लढ्याचा, गारगोटी खजिना हल्ल्याचा इतिहास विशद केला. एन.एम.मुल्ला यांनी प्रमुख वक्त्यांचा परिचय करून दिला.
आपल्या भाषणात प्राचार्य जीवन साळोखे म्हणाले, स्वातंत्र्य लढ्यातील सहभाग असणाऱ्या प्रत्येकाची माता आणि मातीशी नाळ जुळलेली होती. म्हणूनच जिवाची पर्वा न करता स्वातंत्र्यसैनिकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहूती दिली. देश आणि आपले देशबांधव यांच्याशी ते नेहमीच कृतज्ञ होते. सथ्याच्या काळात, हा कृतज्ञतेचा भाव नेहमी जागता ठेवण्यासाठी योग्य प्रकारे वाचन केले पाहिजे. योग्य वाचनातूनच सामाजिक बांधिलकी, सामंजस्य आणि माणुसकीची भावना यांचे जतन होणार आहे. हे स्पष्ट करून ते पुढे म्हणाले, विद्यार्थी दशेपासूनच योग्य वाचनाची सवय आणि आवड जोपासली तर विद्यार्थी अधिक अभ्यासू आणि संस्कारी होतील. सुजलाम – सुफलाम भारताच्या निर्मितीसाठी ते कार्यरत राहतील. असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
ज्येष्ठ साहित्यिक जीवन साळोखे यानी आपल्या समृद्ध शालेय ग्रंथालय आणि वाचन प्रोत्साहनासाठी ग्रंथदान या उपक्रमांतर्गत न्या.रानडे हायस्कूलच्या शालेय ग्रंथालयास पाच हजार रुपये किंमतीची २१ दर्जेदार पुस्तके भेट दिली. स्वातंत्र्यलढ्यातील हुतात्म्यांचे स्मरण हे देशाच्या ज्वलंत इतिहासाला उजाळा देत असल्याने समता,बंधुता देशप्रेम या भावना तरूणामध्ये नव्याने वाढणार आहेत. त्यासाठी स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासाचे वाचन केले पाहिजे. असेही ते म्हणाले.
यावेळी मान्यवरांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. शेवटी प्रा.एन.एस.पाटील यांनी समारोप तर सूत्रसंचालन व्ही.एस.आनुसे यांनी केले. कार्यक्रमाचे नेटके संयोजन प्राचार्य एस.डी. माने व पर्यवेक्षक वाय आर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक विभागाने केले होते.कार्यक्रमापूर्वी एनसीसी छात्रांनी गारगोटीहून क्रांतिज्योत मिरवणुकीने आणली आणि मोठ्या उत्साहात घोषणा देत शाळा परिसर दणाणून सोडला.
दरम्यान, गतवर्षी ( सप्टेंबर-२०२२ ) शिक्षण प्रसारक मंडळ, कोल्हापूर च्या मुरगूड हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, मुरगूड या प्रशालेच्या अमृत महोत्सवी वर्षांनिमित्त सुमारे पंचवीस हजार रुपयाची शंभर दर्जेदार, वाचनीय पुस्तके समारंभपूर्वक भेट दिली होती.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728