नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , ‘चला अक्षर सुधारुया’ : मिणचे खुर्द शिक्षण मंच आयोजित अभिनव शैक्षणिक उपक्रम – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

‘चला अक्षर सुधारुया’ : मिणचे खुर्द शिक्षण मंच आयोजित अभिनव शैक्षणिक उपक्रम

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

‘चला अक्षर सुधारुया’ : मिणचे खुर्द शिक्षण मंच आयोजित अभिनव शैक्षणिक उपक्रम

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, मिणचे खुर्द
मिणचे खुर्द सारख्या ग्रामीण भागातील छोट्याशा गावात येथील शिक्षण मंचच्या वतीने मागील कित्येक दिवस मुलांचा शैक्षणिक विकास व्हावा, या हेतू अनेक शैक्षणिक उपक्रम राबविले जात आहेत. दीपावली सुट्टीनंतर शालेय विद्यार्थ्यांचे दूसरे शिक्षण सत्र सुरु होताच दि.१ डिसेंबर पासून मुलांचे ‘लेखन’ सारखे मूलभूत कौशल्य विकसित करण्यासाठी अक्षरमित्र दीपक सुतार यांची विशेष १० दिवसीय ‘हस्ताक्षर सुधार कार्यशाळा’ आयोजित करण्यात आली होती. याकाळात तज्ञांच्या निरीक्षणाखाली मुलांना दरररोज वळणदार अक्षरांचे वैयक्तिक लक्ष देऊन प्रशिक्षण देण्यात आले. या उपक्रमाचा सांगता समारंभ नुकताच संपन्न झाला. या वेळी सहभागी मुलांच्या लेखन स्पर्धा आयोजित करुन त्यांना पारितोषिके देखील प्रदान करण्यात आली.
याप्रसंगी राधानागरीचे गटशिक्षणाधिकारी बी. एम. कासार यांनी आपले मनोगत मांडताना, सुंदर अक्षर हाच आपला महत्वाचा दागिना असून त्याचे जतन करत यासारखी अनेक कौशल्ये मुलांनी आत्मसात करण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केले.
यावेळी उपक्रमास आर्थिक देणगी देणारे सुशांत सुतार व शंकर देसाई यांना कृतज्ञता पत्र बहाल करण्यात आले. या सोबत मार्गदर्शक दीपक सुतार यांनाही सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. या वेळी माजी जि प सदस्य आर.व्ही.देसाई, सरपंच जयश्री खेगडे, उपसरपंच अरुण कांबळे, अध्यक्ष डी.एस.देसाई, उपाध्यक्ष महावीर पाटील यासह मंच चे सदस्य सर्जेराव देसाई, प्रभाकर पाटील, अशोक परीट, तुकाराम देसाई, मनोहर देसाई व संदीप सुतार आदी. उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव सचिन देसाई यांनी तर आभार किशोर कासार यांनी मानले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728