नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर विभागीय सचिव पदी सुभाष चौगुले – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर विभागीय सचिव पदी सुभाष चौगुले

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर विभागीय सचिव पदी सुभाष चौगुले
ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कोल्हापूर
कोल्हापूर माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या विभागीय सचिवपदी सुभाष चौगुले यांची नियुक्ती झाली आहे.
श्री.सुभाष चौगुले हे कोल्हापूर जिल्ह्यातील मळगे खुर्द (ता. कागल) गावचे सुपुत्र असून त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या विद्यामंदिर, मळगे खुर्द या प्राथमिक शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण मळगे विद्यालय मळगे बुद्रुक या शाळेत झाले. त्यांनी देवचंद कॉलेज, अर्जुननगर येथे बीएससी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. शिवाजी विद्यापीठ येथे एमएससी व आदर्श कॉलेज ऑफ एज्युकेशन पुणे येथून त्यांनी बीएडचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून एमएड पदवी घेतली.
सन २०१३ मध्ये एम.पी.एस.सी. मार्फत शिक्षणाधिकारी म्हणून त्यांची निवड झाली. तत्पूर्वी मेन राजाराम, ज्युनियर कॉलेज कोल्हापूर येथे १४ वर्षे प्राध्यापक म्हणून त्यांनी नोकरी केली. जिल्हा परिषद, सिंधुदुर्गचे शिक्षणाधिकारी (निरंतर) म्हणून दोन वर्षे व कोल्हापूरचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) म्हणून ३ वर्षे काम पाहिले. २०१८ मे पासून कोल्हापूर शिक्षण उपसंचालक कार्यालयात सहाय्यक शिक्षण संचालक म्हणून कार्यरत होते. त्यांनी कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या १८५० शाळेमध्ये त्यांनी ई लर्निंग सेवा उपलब्ध करून दिल्या. कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा सिध्दी उपक्रमात ‘अ’ श्रेणीतील शाळांची सरासरी संख्या राज्यात अव्वल आणली.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930