नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , भारतीय नागरिकांनी कायद्याविषयी माहिती समजून घेणे गरजेचे : न्यायमूर्ती ए.बी जवळे – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

भारतीय नागरिकांनी कायद्याविषयी माहिती समजून घेणे गरजेचे : न्यायमूर्ती ए.बी जवळे

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

भारतीय नागरिकांनी कायद्याविषयी माहिती समजून घेणे गरजेचे : न्यायमूर्ती ए.बी जवळे
ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कागल
21व्या शतकातील भारतीय नागरिकांनी भारतीय संविधानातील विविध कायद्यांची माहिती करून घेतली पाहिजे असे प्रतिपादन न्यायमूर्ती ए.बी.जवळे यांनी केले. दूधगंगा विद्यालयामध्ये आयोजित केलेल्या कायदेविषयक मार्गदर्शन शिबीरात ते बोलत होते. यावेळी सरस्वती च्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले .
न्यायमुर्ती ए.बी. जवळे पुढे म्हणाले की, आपल्या पाल्याच्या शारीरिक,मानसिक, भावनिक बौद्धिक क्षमतेमध्ये खूप बदल झालेला असून मोबाईल च्या वापरामुळे त्यांच्यामध्ये लवकर प्रौढत्व आलेले दिसून येत आहे. यातून मुले चुकीच्या मार्गाला लागणार नाहीत याकडे शिक्षकांबरोबर पालकांनीही गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. पालकांनी आपल्या पाल्यांसोबत मित्र मैत्रिणीसारखे नाते निर्माण करावे आणि आजच्या काळात असेच नाते दृढ करणे आवश्यक आहे. दूधगंगा विद्यालयातील शिक्षक शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात करत असलेले कार्य कौतुकास्पद आहे असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
यावेळी आमच्या विद्यालयाचे माजी विद्यार्थी व कागल बार असोसिएशन चे सदस्य ॲडव्होकेट संभाजी दावणे यांनी *पोक्सो कायदा* याविषयी पालकांना तसेच विद्यार्थी विद्यार्थीनीना सविस्तर माहिती देऊन कायद्यामध्ये केलेल्या सुधारणा याविषयी माहिती दिली. त्यांनी 16 वे वरीस धोक्याचे या गाण्याची ध्वनिफित उपस्थितांना ऐकवून मार्गदर्शन केले.
ॲड. अभिजित सांगावकर यांनी संविधानातील आपले मुलभूत हक्क आणि कर्तव्य कोणती आहेत आणि आपण भारतीय म्हणून आपली जबाबदारी काय आहे याविषयी सविस्तर माहिती दिली .
निर्भया पथकाच्या पोलिस उपनिरिक्षक श्रीमती. जी.एस.पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना पाल्य आणि पालक यांच्यामध्ये हरवलेला संवाद नव्याने सुरू करणे गरजेचे असून पालकांना व विद्यार्थ्यांना समुपदेशन करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले तसेच निर्भया पथकाची समाजाला का गरज आहे, निर्भया पथकाची कार्ये कोणती आहेत हे समजावून सांगत आपल्या मनोगतातून पालकांना व विद्यार्थ्यांना आपलसं करण्याचा प्रयत्न केला.
यावेळी न्यायमूर्ती बी.डी.गोरे, ॲडव्होकेट ए.जे.देसाई,ॲडव्होकेट संग्राम गुरव,ॲडव्होकेट ए.एस.शितोळे तसेच विद्यालयातील पालक बंधु भगिनी, विद्यार्थी विद्यार्थिनी, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
स्वागत प्रास्ताविक मुख्याध्यापक अशोक बुगडे यांनी केले. आभार नाथा चव्हाण यांनी मानले तर सुत्रसंचलन संग्रामसिंह यादव यांनी केले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930