नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , गारगोटी येथे अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन प्रशिक्षण संपन्न – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

गारगोटी येथे अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन प्रशिक्षण संपन्न

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

गारगोटी येथे अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन प्रशिक्षण संपन्न
ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, कोल्हापूर व शिक्षण विभाग पंचायत समिती, भुदरगड यांचे वतीने स्टार्स प्रकल्प व निपुण भारत अंतर्गत तालुक्यातील इयत्ता पहिली ते पाचवीला अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षकांना “अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन व मूल्यमापन” हे पाच दिवसीय तालुकास्तरीय नाविन्यपूर्ण प्रशिक्षण देणेत आले.
डॉ. डी. वाय. पाटील शैक्षणिक संकुल, गारगोटी येथे आयोजित प्रशिक्षण वर्गाचे उदघाटन डॉ. डी. वाय. पाटील शैक्षणिक संकुलाचे कॅम्पस डायरेक्टर श्री.विजयराव घोलपे यांच्या हस्ते रोपट्यास पाणी घालून करण्यात आले. गटशिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे उपस्थित होते.
काळानुरूप आधुनिक बदल स्वीकारून व्यक्ती विकास साधण्याचे ‘शिक्षण’ हे प्रमुख साधन आहे आणि या प्रक्रियेतील महत्त्वाचा दुवा हा शिक्षक आहे. आपल्याला प्रत्येक क्षेत्रात अद्ययावत होणे गरजेचे आहे. सोबतच विकसित राष्ट्र निर्माणासाठी शैक्षणिक गुणवत्ता व दर्जा देखील अतिशय महत्त्वाचा आहे. यामुळेच जागतिक दर्जाचे शिक्षण आता काळाची गरज आहे. पाश्चिमात्य देशांच्या प्रगतीचे मूळ तेथील शिक्षण पद्धतीत आढळते. त्यामुळे आत्मनिर्भर भारतासाठी आपल्या शिक्षण पद्धतीमध्येही कालसुसंगत बदल करणे आवश्यक आहे. अशाच प्रकारचा बदल आपल्याला अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन या प्रशिक्षणातून घडून आणायचा आहे त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये स्वयं अध्ययन करण्याची प्रेरणा व क्षमता निर्माण करणे तसेच शिकण्याची गती वाढवणे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून या प्रशिक्षणाचे आयोजन केले होते.
प्रशिक्षणाच्या तीन टप्प्यांमध्ये जवळपास ४५० शिक्षकांना प्रशिक्षण देणेत आले. तज्ञ मार्गदर्शक म्हणून विस्तार अधिकारी उत्तम पाटील, केंद्रप्रमुख आबासाहेब पसारे, विठ्ठल मगदूम, विद्या मंदिर अनफ बुद्रुक चे अध्यापक सागर मोरे, बशाचा मोळा चे सचिन देसाई, केंद्रशाळा कूर चे मुख्याध्यापक विलास पाटील, संध्या वास्कर, किशोर कासार, जहांगीर मुल्ला यांनी काम पाहिले. नितीन कांबळे यांनी वर्ग समन्वयक म्हणून काम पाहिले. याप्रसंगी कॅम्पस डायरेक्टर विजयराव घोलपे, मुख्याध्यापक एन.जी.कांबळे, एस.डी. वळीवडे, आर. बी.पाटील, राजेंद्र साळोखे आदी उपस्थित होते.
—————————–
फोटो ओळ: गारगोटी: रोपट्यास पाणी घालून प्रशिक्षणाचे उदघाटन करताना विजयराव घोलपे, शेजारी दीपक मेंगाणे, एन.जी.कांबळे, सागर मोरे, एस.डी. वळीवडे आदी…

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031