नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , शिक्षक हे सामाजिक परिवर्तनाचे दूत : प्राचार्य डॉ.आय.सी.शेख खाजगी प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ संपन्न – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

शिक्षक हे सामाजिक परिवर्तनाचे दूत : प्राचार्य डॉ.आय.सी.शेख खाजगी प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ संपन्न

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

शिक्षक हे सामाजिक परिवर्तनाचे दूत : प्राचार्य डॉ.आय.सी.शेख
खाजगी प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ संपन्न

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कोल्हापूर
सध्या समाजात संस्कारमुल्ये पेरण्याचे काम केवळ शिक्षक हेच करत आहेत म्हणून शिक्षकच समाज परिवर्तनाचे दूत आहेत, असे प्रतिपादन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था कोल्हापूरचे प्राचार्य डॉ.आय.सी.शेख यांनी केले. ते खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेच्या आदर्श शिक्षक पुरस्कार व विद्यार्थी पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थांनी पतसंस्थेचे संस्थापक व तज्ञ संचालक भरत रसाळे होते.
डॉ.शेख यांनी सहकारातही शिक्षण महत्वाचे असलेचे सांगून त्यांनी पतसंस्था राबवत असलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. अध्यक्षस्थानावरून बोलताना संस्थेचे संस्थापक श्री.भरत रसाळे म्हणाले, संस्थेच्या प्रत्येक निर्णयात पारदर्शीपणा आणि सर्व सभासदांचे बहुमोल सहकार्य लाभले आहे त्यामुळेच प्रगतीचा आलेख वाढत चालला आहे.
पतसंस्थेच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार सर्वश्री अतार गुलाब बादशहा, सौ. शिंत्रे शोभा प्रकाश, रास्ते स्वाती ज्ञानू, नाईक पिंटू शिवाजी, सौ.संघर्षी वैशाली अमरसिंह यांना देवून सन्मानित करण्यात आले. तर विशेष आदर्श शिक्षक पुरस्कार श्री.सावंत तानाजी गणपती व आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार श्री.सातपुते विजय गणपत यांना देण्यात आला. हिरकणी पुरस्कार नाळे मीनाक्षी विलास व कै. रणजीत पाटील कलाभिनय पुरस्कार श्री.आयरे संतोष बाबुराव व सौ.डावरे सुनीता महादेव यांना देण्यात आला
यावेळी सभासदांच्या मुलांनी मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला तसेच सभासदांच्या इयत्ता पहिली ते पदव्यूतर पर्यंतच्या पाल्यांना शैक्षणिक पारितोषिके देऊन गौरविण्यात आले
यावेळी संचालक सर्वश्री श्री.सूर्यकांत बरगे, श्री.मच्छिंद्र नाळे, श्री.साताप्पा कासार श्री.सर्जेराव नाईक, श्री.कृष्णात चौगुले, श्री. वसंत पाटील, श्री.अमित परीट, सौ. वर्षाराणी वायदंडे, श्री.राजेश कोंडेकर, श्री. संतोष आयरे, श्री. राजेंद्र कोरे, सल्लागार समिती सदस्य श्री.संभाजी सुतार, श्री.अप्पासो वागरे, श्री. पंडित मस्कर, श्री.चंद्रकांत वाकरेकर, श्री. दशरथ कांबळे, सौ.विद्या पाटील व व्यवस्थापक श्री.सदाशिव साळवी यांच्यासह मुख्याध्यापक शिक्षक कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
संस्थेचे चेअरमन श्री.शिवाजी भोसले यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. तसेच संस्था राबवत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी स्वागत पतसंस्थेच्या व्हा.चेअरमन सौ माधुरी घाटगे यांनी केले तर आभार संचालक शिवाजी सोनाळकर यांनी मानले. सूत्रसंचलन संचालिका रोहिणी येडगे यांनी केले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728