नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , शालेय जीवनात इतर कलागुणांबरोबरच विद्यार्थ्यांनी वाचनातून आनंद मिळवला पाहिजे – ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार जीवन साळोखे यांचे प्रतिपादन : पन्हाळा तालुक्यातून यावर्षीच्या ग्रंथदान अभियानास केला प्रारंभ – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

शालेय जीवनात इतर कलागुणांबरोबरच विद्यार्थ्यांनी वाचनातून आनंद मिळवला पाहिजे – ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार जीवन साळोखे यांचे प्रतिपादन : पन्हाळा तालुक्यातून यावर्षीच्या ग्रंथदान अभियानास केला प्रारंभ

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

शालेय जीवनात इतर कलागुणांबरोबरच विद्यार्थ्यांनी वाचनातून आनंद मिळवला पाहिजे – ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार जीवन साळोखे यांचे प्रतिपादन : पन्हाळा तालुक्यातून यावर्षीच्या ग्रंथदान अभियानास केला प्रारंभ

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, पन्हाळा
शालेय जीवनात विद्यार्थ्यांनी इतर कलागुणांबरोबर वाचनातूनही आनंद मिळवला पाहिजे. चौफेर वाचनातून व्यक्तिमत्वाचा विकास होतो. अभ्यासू वृत्ती वाढून खऱ्या अर्थाने प्रभावी व्यक्तिमत्व साकार होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार जीवन साळोखे यांनी केले.
नेहरू विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज, कोतोली (ता.पन्हाळा ) येथे वार्षिक स्नेहसंमेलन व क्रीडा स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे माजी प्राचार्य डी.जी.पाटील होते. तर डी.सी.नरके विद्यानिकेतनचे प्राचार्य ए.एन. पाटील, माजी प्राचार्य बी.आर.आकिवटे, जनसेवा संस्थासमूहाचे प्रमुख सागर वरपे आदी मान्यवर प्रमुख उपस्थित होते.
प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य पी.एस. पोर्लेकर यांनी, पाहुण्यांचा परिचय ज्येष्ठ शिक्षक सुभाष लव्हटे यांनी करून दिला.
यावेळी प्राचार्य जीवन साळोखे यांनी आपल्या ग्रंथदान उपक्रमांतर्गत नेहरू विद्यालयास तीन हजार रुपयाचीआणि प्रमुख उपस्थितांना व प्रशालेच्या पारितोषिक पात्र यशस्वी विद्यार्थ्यांना दोन हजारांची अशी एकूण पाच हजारांची ग्रंथभेट देवून यावर्षीच्या आपल्या ग्रंथदान अभियानास प्रारंभ केला.
यावेळी कोतोली येथील ज्येष्ठ नागरिक, प्रगतशील शेतकरी नामदेव यादव (मामा) यांनी प्रशालेस पन्नास पुस्तके भेट दिल्याबद्दल प्राचार्य जीवन साळोखे यांनी स्वतः त्यांचा सन्मानचिन्ह व पुस्तके भेट देवून गौरव केला.
आपल्या भाषणात प्राचार्य साळोखे पुढे म्हणाले, प्रत्येक विद्यार्थ्यांस आयुष्य असते. पण जो विद्यार्थी नेहमी वाचन करतो, त्याला हमखास उज्ज्वल भविष्य असते. यावेळी नेहरू विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल परंपरेचा प्राचार्य जीवन साळोखे यांनी गौरवाने सविस्तर उल्लेख करून, स्वर्गीय डी.सी.नरके साहेबांनी सहकार क्षेत्राच्या बरोबरीने शैक्षणिक क्षेत्रात भरीव योगदान दिल्याने जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागात विकासाचे नवे पर्व निर्माण झाले, असे प्रतिपादन केले.
यावेळी माजी प्राचार्य डी.जी.पाटील, बी.जी.आकिवाटे, ए.एन.पाटील, सागर वरपे आदींची समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमास प्रशालेच्या आजी-माजी विद्यार्थ्यांसह, महिला पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी आभार सुभाष पाटील यांनी मानले तर सूत्रसंचालन सौ. लक्ष्मी बोरगे मॅडम यांनी केले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728