नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , कलाक्षेत्र लोकाभिमुख होण्याबरोबर स्थानिक कलावंतांच्या कलाकृतींना बाजारपेठ मिळावी यासाठी २४ ते २७ फेब्रुवारी दरम्यान कोल्हापुरात कला महोत्सवाचे आयोजन : आर्ट फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांची माहिती – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

कलाक्षेत्र लोकाभिमुख होण्याबरोबर स्थानिक कलावंतांच्या कलाकृतींना बाजारपेठ मिळावी यासाठी २४ ते २७ फेब्रुवारी दरम्यान कोल्हापुरात कला महोत्सवाचे आयोजन : आर्ट फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांची माहिती

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

कलाक्षेत्र लोकाभिमुख होण्याबरोबर स्थानिक कलावंतांच्या कलाकृतींना बाजारपेठ मिळावी यासाठी २४ ते २७ फेब्रुवारी दरम्यान कोल्हापुरात कला महोत्सवाचे आयोजन : आर्ट फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांची माहिती

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कोल्हापूर
कोल्हापूर आर्ट फौंडेशन संस्थेचा चौथा कोल्हापूर कलामहोत्सव २४ ते २७ फेब्रुवारी २०२४ रोजी आयोजित करण्यात आला असून यामध्ये चित्र, शिल्प क्षेत्रातील कलावंत आपल्या दर्जेदार कलाकृतीसह सहभागी होणार आहेत.
आधुनिक काळात आपल्या कोल्हापूरची कला एका नव्या वळणावर उभी आहे. कलाक्षेत्रात नवे प्रयोग, संदर्भ, विचार एकमेकांना पुरक ठरावेत आणि यातून कोल्हापूरचे कलाक्षेत्र अधिकाधिक लोकाभिमुख व्हावे, स्थानिक कलावंतांच्या कलाकृतींना बाजारपेठ मिळावी असा प्रामाणिक प्रयत्न कोल्हापूर कला महोत्सवाच्या आयोजनाच्या निमित्ताने कोल्हापूर आर्ट फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी केला आहे.
यापूर्वी २०११ साली पहिला, २०१४ साली दुसरा आणि २०१८ साली तिसरा कला महोत्सव संपन्न झाला. प्रत्येक वेळी विविध क्षेत्रातील जाणकारांसोबत तीन ते चार लाख कला रसिकांनी भेट दिली आहे. कला क्षेत्रातील हे एक दर्जेदार व्यासपीठ असल्यामुळे जाणकार कला रसिक लाखो रुपयांच्या कलाकृती येथे खरेदी करत असतात.
गेल्या वेळेप्रमाणेच कोल्हापूर आर्ट फौंडेशनच्या या चौथ्या कला महोत्सवासाठी दसरा चौकातील मैदानावर कलादालन सदृश्य मंडप उभा केला जाणारा आहे. त्यामध्ये चित्रकार, शिल्पकार, हस्त कारागीर यांना आपल्या कलाकृती प्रदर्शित करण्यासाठी स्टॉल असणार आहेत. या सोबत कोल्हापुरातील अस्सल खाद्य पदार्थांचे स्टॉल, विविध वाद्य आणि संगीताचे दर्जेदार कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
कोल्हापूर आर्ट फौंडेशनद्वारा कला महोत्सवाची तयारी सुरू असून त्यामध्ये सहभागी होण्यासाठी माहिती व मार्गदर्शनासाठी समन्वयक प्रशांत जाधव, प्राचार्य अजेय दळवी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आमदार सतेज पाटील साहेब यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031