नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , दासववाडीच्या तरुणाचा असाही प्रामाणिकपणा : तब्बल सव्वा दोन तोळ्याची सोन्याची चेन केली परत – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

दासववाडीच्या तरुणाचा असाही प्रामाणिकपणा : तब्बल सव्वा दोन तोळ्याची सोन्याची चेन केली परत

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

दासववाडीच्या तरुणाचा असाही प्रामाणिकपणा : तब्बल सव्वा दोन तोळ्याची सोन्याची चेन केली परत

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
दासववाडी (ता. भुदरगड) येथील युवक राजेंद्र पांडुरंग पोवार यांनी सोन्याची तब्बल सव्वा दोन तोळ्याची व दीड लाख रुपये किंमतीची सापडलेली चेन परत करून प्रामाणिकपणाचा आदर्श सर्वांसमोर उभा केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, वेळ दुपारची. चिमगाव (ता.कागल) येथील कृष्णात नारायण आमते हे मध्यमवर्गीय कुटुंबातील इसम व त्यांचे कुटुंबीय मुलगीच्या लग्नाच्या खरेदीसाठी गारगोटी येथे आले होते. गारगोटी येथील नेहमीच गजबजलेल्या व वर्दळ असलेल्या श्री.साई मंदिर परिसरातील आर. पॉईंट या सलून दुकानासमोर आपली दुचाकी गाडी पार्क करून ते खरेदीसाठी निघून गेले. गाडी पार्क करताना त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन पडल्याचे त्यांच्या लक्षात आले नाही. काही वेळानंतर आमते कुटुंबीय खरेदी करून पुन्हा गाडी घेऊन चिमगाव कडे रवाना झाले. त्याचवेळेस आर. पॉईंट या सलून दुकानाचे मालक राजेंद्र पोवार दुकान बंद करून जेवण्यासाठी घरी निघाले होते. अगदी याच क्षणी त्यांना गाडी पार्क केलेल्या ठिकाणी कोणाची तरी चेन पडल्याचे लक्षात आले त्यांनी ती चेन उचलली व दुकानांमध्ये ठेवून दिली.
कृष्णात आमते व त्यांच्या कुटुंबीयांना घरी गेल्यानंतर आपली चेन हरवल्याचे लक्षात येताच ते गोंधळून गेले व क्षणाचाही विलंब न लावता आमते दाम्पत्य पुन्हा गारगोटीकडे चेनचा शोध घेण्यासाठी आले. गारगोटी येथे ज्या ज्या ठिकाणी ते फिरले त्या सर्व ठिकाणी त्यांनी चेनचा शोध घेतला पण पदरी निराशाच आली. आपली चेन आता हरवली ती पुन्हा सापडणे शक्य नाही या विचाराने ते हैराण झाले. शेवटी ज्या ठिकाणी गाडी पार्क केली होती त्या ठिकाणी चेनचा शोध घेत असताना सलूनचे मालक राजेंद्र त्या ठिकाणी आले त्यांची शोध मोहीम राजेंद्रने आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहिली अन त्याच वेळेस त्याच्या लक्षात आले की आपण दुकानांमध्ये ठेवलेली चेन ही दुसऱ्या कोणाची नसून यांचीच आहे. या युवकाने त्यांना दुकानात बोलावले, माहिती घेतली,ओळख पटविली व प्रामाणिकपणाने दीड लाख रुपये किंमत असणारी ही सोन्याची चेन त्यांच्याकडे सुखरूप सुपूर्द करून आपल्या प्रामाणिकपणाचा वेगळा आदर्श समाजासमोर ठेवला. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असताना मुलगीच्या लग्नाचा खर्च आई-वडिलांना झोपू देत नव्हता. अशा परिस्थितीत हा प्रसंग उद्भवल्याने आई-वडील व मुलगी पुरते गोंधळून गेले. पण या तरुणाने प्रामाणिकपणाने ही चेन परत केल्याने आमते दाम्पत्य भावुक झाले. आपली चेन सापडली यावर त्यांचा विश्वास बसेना आणि ते नि: शब्द झाले. सदर युवकाला त्यांनी पाचशे रुपये देण्याचा प्रयत्न केला पण या युवकाने ते पैसे घेण्यासही नकार दिला. शेवटी साश्रू नयनांनी आमते दाम्पत्याने सदर युवकाला मनापासून धन्यवाद दिले व आनंदाने आपल्या घरी परतले.
एकीकडे सोन्याचे भाव गगनाला भिडले असताना, स्वार्थासाठी, पैशासाठी समाजात खून दरोडे होत असताना, भौतिक सुखासाठी नातीगोती विरत चालली असताना मूळचा दासववाडी या ग्रामीण भागातील असणारा व सध्या व्यवसायानिमित्त गारगोटी येथे वास्तव्यास असणारा राजेंद्र मात्र स्वतःच्या मोहावर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी ठरला. राजेंद्र हा नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असून त्याची पत्नी आरती या सध्या ग्रामपंचायत कोंडोशी येथे सदस्या म्हणून कार्यरत आहेत.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930