महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मुदाळ येथील विनायक पाटील राज्यात प्रथम : उपजिल्हाधिकारी पदी निवड
|
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मुदाळ येथील विनायक पाटील राज्यात प्रथम : उपजिल्हाधिकारी पदी निवड
ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
घरची गरिबी. वडील मिळेल ते काम धंदा करून आपल्या उपजिवीकेसोबत मुलाचे शिक्षण सांभाळत होते. कधी रिक्षा चालवून तर कधी चहा विकून आपला संसार वडिलांनी चालवला होता. सोबतीला थोडी शेती होती. अशाच सर्वसामान्य कुटुंबातील मुलाने महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत
(एम.पी.एस.सी.) घेण्यात आलेल्या उपजिल्हाधिकारी पदाच्या परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. मुदाळ (ता. भुदरगड) येथील विनायक नंदकुमार पाटील हा उपजिल्हाधिकारी झाला आहे.
हुशार, होतकरू असणाऱ्या विनायक पाटील यांचे प्राथमिक शिक्षण विद्यामंदिर, मुदाळ येथे झाले. तर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण येथील प.बा.पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात झाले. विनायकला दहावी मध्ये ९३.२० तर बारावी मध्ये ९३.५४ गुण होते. पदवीचे शिक्षण फर्ग्युसन कॉलेज, पुणे येथे पूर्ण केले. बीएससी संख्याशास्त्र या विषयात त्यांनी पदवी प्राप्त केली. बीएससी ला ८२ टक्के गुण मिळविले.
यानंतर कोणताही खाजगी क्लास न लावता स्वयं अध्ययन करून २०२२ मध्ये उपजिल्हाधिकारी पदाची परीक्षा दिली. व पहिल्याच प्रयत्नात त्याने हे यश मिळवले. उपजिल्हाधिकारी होण्याचा मान मिळवला. या अगोदर उपशिक्षणाधिकारी परीक्षा पास झाला होता. तसेच एसटीआय, एएसओ या परीक्षाही तो चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला आहे. विनायक पाटील यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
…………………
कष्टाचे चीज झाले..
विनायक शालेय जीवनापासूनच पासूनच हुशार होता. शिक्षणाची जिद्द होती. मोठा अधिकारी होणार होता याची आम्हास खात्री होत. त्या दृष्टिकोनातून त्याने प्रयत्नही केले. तो ध्येयवेडा होऊन अभ्यासात मग्न होत होता. आम्ही कुटुंबीयांनीही त्याला काही कमी पडू दिले नाही. मिळेल ती कामे केली. आमच्या कष्टाची चीज झाले. मुलगा उपजिल्हाधिकारी झाला याचा अभिमान आहे
नंदकुमार पाटील, वडील
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
आणखी कथा





